Maharashtra Band | बदलापूर घटनेवरून राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न | आमदार माधुरी मिसाळ

आमदार माधुरी मिसाळ यांच्या सोबत भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे, हर्षदा फरांदे, अमोल कविटकर, हेमंत लेले , पुष्कर तुळजापूरकर या वेळी उपस्थित होते.

HomeBreaking News

Maharashtra Band | बदलापूर घटनेवरून राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न | आमदार माधुरी मिसाळ

Ganesh Kumar Mule Aug 23, 2024 7:56 PM

Badlapur News | मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
BJP Pune Agitation | बदलापूर च्या दुर्दैवी घटनेचे राजकारण करणे महाविकास आघाडी ला शोभत नाही | धीरज घाटे
Sandeep Khardekar | महाविकास आघाडीने राज्यात अराजक सदृश परिस्थिती निर्माण न करता उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे | भाजपा प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांचे आवाहन

Maharashtra Band | बदलापूर घटनेवरून राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न | आमदार माधुरी मिसाळ

 

Badlapur News – (The Karbhari News Service) – बदलापूरमध्ये राज्यासाठी लज्जास्पद घटना घडल्यानंतर महायुती सरकारने तात्काळ पावले उचलली. मात्र महाविकास आघाडीचे नेते या दुर्दैवी घटनेचे राजकारण करून राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) यांनी शुक्रवारी केला.

भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे, हर्षदा फरांदे, अमोल कविटकर, हेमंत लेले , पुष्कर तुळजापूरकर या वेळी उपस्थित होते.

बदलापूर प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा नक्की होणार, महायुती सरकार त्या दिशेने प्रयत्नशील आहे अशी ग्वाही मिसाळ यांनी दिली. बदलापूर प्रकरणातील दुटप्पी भूमिकेचे वाभाडे काढले. माणुसकीला लाजवेल अशा बदलापूरच्या प्रकरणात विरोधकांकडून महायुती सरकार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होत असलेल्या टीकेचा समाचार मिसाळ यांनी घेतला.

मिसाळ म्हणाल्या, या प्रकरणी तात्काळ एसआयटी नेमली, अकार्यक्षम पोलिसांना बडतर्फ केले, सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक केली, सर्वपक्षीय मंडळी विश्वस्त मंडळावर असलेल्या संबंधित शैक्षणिक संस्थेची चौकशी सुरु केली, नराधमाला अटक केली. महायुती सरकारने शक्य ते सर्व तातडीने केले. याप्रकरणात एफआयआर नोंदवण्याबाबत पोलिसांकडून दिरंगाई घडल्याची टीका केली जाते आहे. मात्र लहान मुलगी पोलीस ठाण्यात आल्यानंतर लगेच वैद्यकीय तपासणीला पाठवले, तपासणीला किमान 3-4 तास लागतात. त्यानंतर तिच्याकडून पोलीस ठाण्यात जबाब नोंदवून घेतला. सरकारने आवश्यक ती सगळी पावले उचलली आहेत. असे असताना विरोधकांकडून या दुर्दैवी प्रकरणी राजकीय पोळ्या भाजण्याचे काम केले जात आहे असा आरोप मिसाळ यांनी केला.

मविआ नेत्यांच्या अलीकडच्या काळातील काही वक्तव्यांचा विचार करता बदलापूरच्या दुर्दैवी घटने नंतरचे आंदोलन, रेल रोको हे सगळे मुद्दाम ठरवून होते आहे का याचा विचार सूज्ञ जनतेने करायला हवा असे मिसाळ यांनी सांगितले आंदोलनकर्त्यांच्या हातात, ‘लाडकी बहीण योजना रद्द करा’, असे फलक का होते? संवेदनशील प्रसंगावेळी या लोकांच्या हातात असे बॅनर्स का होते असा सवाल करत बदलापूर घटनेच्या आडून लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचा मविआच्या नेत्यांचा कट आहे असा घणाघात मिसाळ यांनी केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0