M J Pradip Chandren IAS | अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांच्याकडे १९ विभागांची जबाबदारी

Homeadministrative

M J Pradip Chandren IAS | अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांच्याकडे १९ विभागांची जबाबदारी

Ganesh Kumar Mule Mar 11, 2025 7:43 PM

PMC Special School Students | पुणे महापालिकेच्या विशेष शाळेतील मुलांनी बनविलेल्या  वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री या उपक्रमाचा शुभारंभ
Otherwise construction will have to be stopped | PMC Commissioner Dr. Rajendra Bhosale
Pune Development Projects | पुण्यातील विकासप्रकल्पांना गती देण्याचे भाजपचे मंत्री मोहोळ आणि पाटील यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश! 

M J Pradip Chandren IAS | अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांच्याकडे १९ विभागांची जबाबदारी

| महापालिका आयुक्त यांचे आदेश जारी

 

PMC Additional Commissioner – (The Karbhari News Service) – महापालिकेला एम जे प्रदीप चंद्रन (M J Pradip Chandren IAS) यांच्या रूपाने नवीन अतिरिक्त आयुक्त मिळाले आहेत. त्यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त (जनरल) या पदाचा पदभार देण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्याकडे आता १९ विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी या बाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

यापूर्वी सर्व अतिरिक्त आयुक्त यांच्याकडील पदांचा पदभार हा अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र आता अधिकारांमध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या तरतुदीनुसार खाली दर्शविण्यात आलेल्या लाखात्यांचे/विभागांचे कामकाज महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या निरनिराळ्या प्रकरणांत असलेल्या विविध तरतुदी खाली नमूद केलेले व कलम ६९ (१) च्या प्राप्त अधिकारानुसार खालील विभागाचे आयुक्तांचे अधिकार आणि कर्तव्य महापालिका आयुक्त यांच्या यापूर्वी आर्थिक मर्यादेचे ठराव व सर्वसाधारण नियंत्रणासापेक्ष खालील अतिरिक्त आयुक्त यांना देणेत आले आहेत.

अतिरिक्त महानगरपालिक आयुक्त (ज)

१) मागासवर्ग विभाग

२) मुख्य लेखा व वित्त विभाग

३) आरोग्य विभाग

४) उप आयुक्त (विशेष) विभाग, जनरल रेकॉर्ड विभाग

५) सामान्य प्रशासन विभाग

६) लेखापरिक्षण विभाग

७) बांधकाम विभागाचे कामकाजातील महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमा खालील ५३,५५,५६ खालील नियंत्रण मात्र मंजुर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली व
नागरी विमान वाहतुक मंत्रालय (विमान प्रचालन सुरक्षेसाठी इमारत उंची निर्बंध) नियम २०१५ खालील प्रकरणे वगळून.

८) परिमंडळ विभाग क्र. १ ते ३ चे प्रशासन

९) झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग

१०) अग्निशमन दल

११) अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मुलन

(१२) पाणीपुरवठा

१३) पाणीपुरवठा प्रकल्प

(१४) तांत्रिक विभाग

१५) प्राथमिक शिक्षण विभाग

१६) शिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक) विभाग

१७) माहिती व तंत्रज्ञान विभाग

१८) कामगार कल्याण विभाग

१९) मंडई विभाग

सर्व धोरणात्मक बाबी व अंतर्गत खात्याशी समन्वय यावरील पर्यवेक्षणाचे अधिकार महापालिका आयुक्त यांना राहतील. असे आदेशात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: