लुंबिनी उद्यान महापालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण स्पर्धेत ठरले प्रथम | मिळाली मध्यम टॉफी आणि प्रशस्तीपत्रक
पुणे महापालिका उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने फळे, फुले, भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नीटनेटके नियोजन केल्यामुळे पुणे माहपालिका प्रभाग क्रमांक दोनच्या लुंबिनी उद्यानाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. उद्यानाच्या सुशोभिकरणात आणि नीटनीटकेपणाचे योग्य नियोजन आम्ही केले होते. विकासाच्या दृष्टीमुळे आणि कर्मचारी, नागरिक यांच्या सहाय्याने लुंबिनी उद्यान प्रथम ठरले आहे. अशी माहिती माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिली. (PMC pune Lumbini park)
डॉ धेंडे यांनी सांगितले कि, आरोग्याबाबत नागरिक मोठ्या प्रमाणात जागृत झाले आहेत. पहाटे व्यायामाला जाणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. नागरिकांना फिरण्यासाठी योग्य सुविधा देणे गरजेचे आहे. या उद्देशाने लुंबिनी उद्यानाची निर्मिती डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने करण्यात आली. उद्यानात नागरिकांना फिरण्यासाठी सुसज्ज ट्रॅक तयार केले आहेत. त्यावरून नागरिक चालण्याचा आणि धावण्याचा व्यायाम करत आहेत. उद्यानात शांतीचा मार्ग सांगणारे गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा उभारण्यात आल्या आहेत. केवळ प्रतिमा न उभारता त्याखाली मानवी जीवन समृद्ध करणारे विचार देखील नमूद करण्यात आले आहेत. उद्यानात मध्यभागी गोलाकार लहान हॉल तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये तरूण, ज्येष्ठ योगाचा व्यायाम करतात.
या बरोबरच लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उद्यानात कुठेही अस्ताव्यस्त कचरा पडलेला नाही. उद्यानाच्या वेळा नियमितपणे पाळल्या जात आहेत. ज्येष्ठांचा हास्य क्लब भरतो. त्याचा देखील फायदा होत आहे. उद्यानात स्वच्छ शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची देखील सुविधा आहे. या बरोबरच एका सुरक्षारक्षकाबरोबरच माळी देखील या ठिकाणी कार्यरत आहेत.
माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून उद्यानाच्या देखभाल दुरूस्तीबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. नवीन उपक्रम या ठिकाणी राबविले जात आहेत. त्यांच्यामार्फत दिलेल्या सुविधांमुळे महापालिकेच्या वतीने दखल घेण्यात आली. पुणे महापालिका उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने फळे, फुले, भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन 2023 च्या स्पर्धेत सरस ठरत उद्यानाने प्रथम क्रमांक पटकाविला. असे हि धेंडे यांनी सांगितले.