हेमंत रासने यांचे महापालिका आयुक्तांना पत्र
: बजट सादर करू न दिल्यास कोर्टात जाण्याची भूमिका
पुणे : 14 मार्च ला स्थायी समितीचे अंदाजपत्रक मंजुर करून ते मुख्यसभेपुढे मांडण्यासाठी पाठविले जाईल असा दावा स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र देण्यात आले असून कायदेशीर सल्ला घेऊच हे पत्र देण्यात आल्याचे रासने म्हणाले. तर प्रशासनाने अंदाजपत्रक सादर करू न दिल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही रासने यांनी दिला आहे.
: स्थायी समिती विसर्जित होत नाही : रासने
महापालिकेची मुदत संपत असल्याने तसेच कायद्यातील तरतूदीनुसार स्थायी समिती अध्यक्षांना अंदाजपत्रक सादर करणे शक्य नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत असली तरी महापालिकेची मुदत संपली तरी स्थायी समिती ही विसर्जित होत नाही असा दावा समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी केला आहे.
महापालिका आयुक्तांकडून सर्वसाधारणपणे 17 जानेवारी पूर्वी स्थायी समितीस अंदाजपत्रक सादर केले जाते. मात्र, या वर्षी महापालिका निवडणूका लांबल्या असल्या तरी आयुक्तांनी सात मार्चला अंदाजपत्रक सादर केले. त्याच वेळी, 14 मार्चला पालिकेची मुदत संपत आहे. अशा स्थितीत स्थायी समितीला अंदाजपत्रक मुख्यसभेत मांडण्यासाठी सात दिवसांची सभा बोलविण्याची नोटीस देणे आवश्यक असते. मात्र, आता पालिकेची मुदत संपणार असल्याने ही सभाच होणार नाही. दरम्यान रासने कसे बजेट सादर करणार हा मुद्दा उपस्थित होत आहे.
COMMENTS