MLC Election | विधान परिषद निवडणूक निकाल | मविआला धक्का; भाजपाची बाजी

HomeBreaking NewsPolitical

MLC Election | विधान परिषद निवडणूक निकाल | मविआला धक्का; भाजपाची बाजी

Ganesh Kumar Mule Jun 20, 2022 5:52 PM

Ajit Pawar Vs BJP | अजित पवार यांच्या विरोधात पुणे भाजपचे आंदोलन | पवार यांनी माफी मागण्याची मागणी
Dr Kumar Ketkar | भाजपकडून धार्मिक द्वेष पसरवण्यासह मतांचे ध्रुवीकरणाचे काम | डॉ. कुमार केतकर यांचे प्रतिपादन
Water problem of Baner Balewadi | बाणेर बालेवाडी च्या गंभीर पाणी प्रश्ना बाबत महापालिका अधिकारी निष्क्रिय | अमोल बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांचे  ४ ते ५ तास ठिय्या आंदोलन

विधान परिषद निवडणूक निकाल | मविआला धक्का; भाजपाची बाजी 

दोन तासांच्या विलंबानंतर विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आता पहिल्या फेरीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपचे सर्वच्या सर्व 5 उमेदवार विजयी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 2 शिवसेनेचे (Shivsena) 2 आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाले आहेत.

 

भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे, प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेही विजयी झाले आहेत. तसेच काँग्रसेचे भाई जगताप विजयी झाले आहे. मात्र, पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा या निवडुकीत पराभव झाला आहे.

 मतमोजणीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत बाद ठरवण्यात आले होते. तर, त्यानंतर मविआने भाजपच्या उमा खापरे यांच्या कोट्यातील एका मतावर आक्षेप घेतला होता. भाजपकडून रामराजे यांच्या निंबाळकरांच्या कोट्यातील एका मतावर आक्षेप घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्वीट केले होते. यामध्ये त्यांनी भाजपकडून खोट्या बातम्या पेरायला सुरुवात. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोट्यातील मत बाद झाल्याची बातमी खोटी. भाजपकडून संभ्रम निर्माण करायला सुरुवात असे म्हणत भाजपवर हल्लाबोल केला होता.मुक्ता टिळक अन् लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप सकाळी मतदानावेळी काँग्रेसकडून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला होता. मुक्ता टिळक जगताप यांची मतदान पत्रिका दुसऱ्या कोणीतरी मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. तसेच मतदानावेऴी दोन सहकारी उपस्थित असल्याचाही आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे ही तक्रार करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना  फडणवीसांनी मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचे आभार देखील यावेळी त्यांनी मानले, पाचव्या उमेदवारासाठी आमच्याकडे एकही मत नव्हतं, तरीही आम्ही कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा जास्त मतं घेतली असे फडणवीस यावेळी म्हणाले. या निकालानंतर महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी पाहायला मिळाली असे ते म्हणाले, या सरकारच्या विरोधातील असंतोष समोर आला आहे, यापुढे असाच संघर्ष सुरू राहील आणि लोकाभिमुख सरकार आणल्यानंतरच तो थांबेल असे देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, चमत्कार मी मानत नाही, असंतोष मतांमध्ये परिवर्तीत झाला आहे. तो वाढत राहीला तर काय होऊ शकतो तेच या निकालाने दाखवून दिलं असे फडणवीस म्हणाले. कोणाची किती मतं फुटली ते आम्हाला माहिती आहे, मी सगळ्या आमदारांचे आणि अपक्षांचे आभार मानतो ज्यांनी आमचे पाच उमेदवार निवडून आणले. आमचा संघर्ष जनतेसाठी आहे सत्तेसाठी नाही असे देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.