MLC Election | BJP Pune | विधानपरिषद निवडणूक |  भाजपचा विजयी जल्लोष

HomeपुणेBreaking News

MLC Election | BJP Pune | विधानपरिषद निवडणूक |  भाजपचा विजयी जल्लोष

Ganesh Kumar Mule Jun 21, 2022 11:57 AM

karnataka election 2023 | कर्नाटक निवडणूक आणि तिथले राजकरण समजून घ्या
MLC election : विधान परिषद निवडणूक : महाविकास आघाडीला धक्का  : सहापैकी 4 जागांवर भाजप विजयी 
Ballot Paper Election | भाजपला बॅलेट पेपर का नकोत ? | राज्यातील महापालिका निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या | माजी आमदार मोहन जोशी

विधानपरिषद निवडणूक |  भाजपचा विजयी जल्लोष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरील विश्वास, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे यशस्वी नेतृत्व, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची समर्थ साथ, भाजपवरील जनतेचा विश्वास, भाजपचे विकासाचे धोरण, सुशासन आदीचा हा विजय असून, आघाडी सरकारच्या अंधकारमय कारभाराला सुरूंग लावून विकासाची मशाल पेटविणारा हा विजय असून, राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेत पाचही जागांवर मिळविलेला विजय हा देवेंद्रजींची कमाल असल्याचे मत भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले.

विधान परिषदेतील यशानंतर शहर भाजपच्या वतीने आज महापालिकेसमोरील पक्षाच्या कार्यालयासमोर शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मुळीक बोलत होते. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, सरचिटणीस राजेश येनपुरे, गणेश घोष, प्रमोद कोंढरे, रविंद्र साळेगावकर, धनंजय जाधव, निहाल घोडके, चंद्रकांत पोटे, सुशील मेंगडे, अजय खेडेकर, दत्तात्रय खाडे, संदीप लोणकर, गणेश कळमकर, आरती कोंढरे, गायत्री खडके, अन्वर पठाण, संदीप काळे, अजय दुधाणे उपस्थित होते.

मुळीक म्हणाले, राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीत विजयाची किमया करणारे देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविला असून, स्वबळावर म्हणजे काय याचा राजकारणात अर्थ शिकविला. अन्य पक्षाच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण करावे, ज्यांना स्वत:चे आमदार सांभाळता येत नाही, त्यांनी आता न बोललेच बरे राहिल.