Labour Éducation Foundation Day | ६७वा श्रमिक शिक्षण स्थापना दिवस उत्साहात साजरा

Homeadministrative

Labour Éducation Foundation Day | ६७वा श्रमिक शिक्षण स्थापना दिवस उत्साहात साजरा

Ganesh Kumar Mule Sep 19, 2024 10:40 AM

PMC Retired Employees | बोनाला, महाडदळकर यांच्यासह पुणे महापालिकेचे 45 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!
PMC Labour Welfare Department | राज्य माहिती आयोगाकडून पुणे महापालिकेचे कौतुक | राज्यातील सर्व महापालिकांना पुणे मनपा प्रमाणे काम करण्याचे आदेश
PMC Pune Retired Employees | आपले शरीर स्वस्थ तर सर्व दुनिया स्वस्त – डॉ दत्ता कोहिनकर यांनी दिला मंत्र | पुणे महापालिकेचे 156 कर्मचारी सेवानिवृत्त!

Labour Éducation Foundation Day | ६७वा श्रमिक शिक्षण स्थापना दिवस उत्साहात साजरा

 

Labour Education Foundation Day – (The Karbhari News Service) – दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षण व विकास बोर्डाचा ६७वा श्रमिक शिक्षण स्थापना दिवस / हिंदी दिवस महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवनच्या कॉन्फरन्स हॉल, औंध, पुणे येथे १८ स्पटेंबर २०२४ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.

सुरुवातीला श्रीमती. अरुणा विष्णू वाघ, प्रादेशिक संचालिका प्र. यांनी 16 सप्टेंबर बद्दल म्हणजेच कामगार
शिक्षण दिवसा विषयी प्रास्ताविक सादर केले. सारिका डफरे, शिक्षणाधिकारी यांनी पाहुणे व मान्यवरांचे
स्वागत केले.

यावेळी प्रमुख पाहुणे नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी, पुणे महानगरपालिका यांनी प्रादेशिक
संचालनालय, पुणे यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. असंघटित कामगारांच्या प्रभावी आणि विस्तारित
सहभागासाठी प्रोत्साहन आणि मानधन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली जेणेकरून त्यांचा वेळ आणि श्रम सार्थकी लागतील.

अतिथी श्री. संजय गिरी, संयुक्त संचालक, उद्योग सुरक्षा आणि आरोग्य यांनी देशाच्या आर्थिक विकासासाठी कामगार शिक्षणाची गरज यावर आपले मत व्यक्त केले आणि कामगार शिक्षण योजना तळागाळापर्यंत यशस्वीपणे राबविल्याबद्दल मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

या प्रसंगी आमच्या प्रशिक्षण कार्याक्रमांमध्ये सक्रिय भागा घेणा-या स्वयंसेवक शंकर गवळी आणि अस्मिता गडचे तसेच बार्डाचे पूर्व प्रादेशिक संचालक श्री. सुरेन रामटेके यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.

राष्ट्रभाषा दिवसा निमित्त हिंदीचे महत्त्व श्रीमती रेखा सिंह, वरिष्ठ लिपिक, पुणे यांनी विशद केले. श्री. शिरीष नाईकरे, आणि श्री. गणेश कलापुरे, औंध सोशल फाऊंडेशन आणि श्री. शंकर गवळी, सीएफएआर यांनी देखील ई- श्रम कार्ड, एन. सी. एस इत्यादीसाठी सभासदांची नोंदणी करताना येणाऱ्या समस्यांबाबत आपले मत व्यक्त केले.

गौरी कासार, कौटुंबिक समुपदेशक, पीएमसी यांनीही कामगार शिक्षणाबाबत आपले मत व्यक्त केले आणि लवकरच होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान करणे अनिवार्य करण्याची शपथ घेण्यात आली. SHS मोहीम 4.0 च्या निमित्ताने उपस्थित सर्व अधिकारी आणि सहभागींनी स्वच्छता प्रतिज्ञा देखील घेतली.

आभारप्रदर्शन श्रीमती गौरी यावगल यांनी केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.