Kondhawa yevlewadi Ward office | कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाचे जनजागृती व स्वच्छता अभियान | १६१५ किलो कचरा गोळा करण्यात आला
Pune PMC News – (The Karbhari News Service) उप आयुक्त , परिमंडळ क्र. ४ व उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रणाखाली ब्रँड ॲम्बेसिडर विक्रांत सिंह यांच्या माध्यमातून आज शनिवार रोजी सकाळी ७.३० ते १०.३० कालावधीत ऐतिहासिक पेशवे तलाव या परिसरात VIT कॉलेज बिबवेवडी येथील ९० + विद्यार्थी तसेच क्षेत्रिय कार्यालय कडील अधिकारी कर्मचारी, स्थानिक नागरीक यांचे मार्फत परीसर स्वछ करुन १६१५ किलो कचरा गोळा करण्यात आला. (Pune Municipal Corporation – PMC)
स्वच्छता अभियान दरम्यान नागरिकांमध्ये उघड्यावर्ती कचरा न टाकने , सिंगल use प्लास्टिक वापर न करणे , सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये इत्यादी बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.
सदर स्वच्छता मोहिमेदरम्यान आलेल्या विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत महापालिका सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांनी मार्गदर्शन करुन स्वच्छतेविषयी प्रतिज्ञा घेण्यात आली. सदर अभियाना दरम्यान कोंढवा येवलेवडी व धनकवडी क्षेत्रिय कार्यालय कडील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.
COMMENTS