Kojagiri Purnima 2024 | PMC Garden Department | कोजागिरी पौर्णिमे निमित्त महापालिकेची उद्याने रात्री 12 पर्यंत उघडी राहणार!

Homeadministrative

Kojagiri Purnima 2024 | PMC Garden Department | कोजागिरी पौर्णिमे निमित्त महापालिकेची उद्याने रात्री 12 पर्यंत उघडी राहणार!

Ganesh Kumar Mule Oct 14, 2024 7:43 PM

PMC Garden Department | अवघ्या 5 रुपयात पुणे महापालिकेकडून घ्या स्थानिक जातीची रोपे
  Be careful if you harm the tree for Holi!  The fine can be up to 1 lakh!  |  Warning of Garden Department of Pune Municipal Corporation
 Pune Municipal Corporation’s (PMC) 42nd Fruits, Flowers and Vegetables Competition and Exhibition on 10th and 11th February!

Kojagiri Purnima 2024 | PMC Garden Department | कोजागिरी पौर्णिमे निमित्त महापालिकेची उद्याने रात्री 12 पर्यंत उघडी राहणार!

| मुख्य उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे यांची माहिती

 

Kojagiri Purnima 2024 – (The Karbhari News Service) – “कोजागिरी पौर्णिमा” (Kojagiri Purnima) निमित्त पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीमधील उद्यानांच्या (PMC Garden) वेळेत वाढ करण्यात आली आहे. कोजागिरी पौर्णिमा” निमित्त पुणे महानगरपालिका हद्दीमधील उद्याने सकाळी ६.०० ते ११.०० व सायंकाळी ४.३० ते रात्री १२.०० वा. पर्यंत उघडी ठेवण्यात येणार आहेत. पुणे शहरातील नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन महापालिकेचे मुख्य उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे (Ashok Ghorpade PMC) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

घोरपडे यांच्या माहितीनुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ६६ (१०) अन्वये, सार्वजनिक उद्याने, बागा, मनोरंजनासाठी मोकळ्या जागांची तरतूद करणे, नागरिकांच्या मनोरंजनासाठी उद्याने /बागा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. पुणे महानगरपालिका अधिकारी क्षेत्रामध्ये एकूण १५ क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीअंतर्गत उद्यान विभागामार्फत एकूण २११ उद्याने, मत्सालय व प्राणी संग्रहालय विकसित करण्यात आलेली आहे. सदर उद्यानांचे विकसन, सुशोभिकरण, देखभाल, देखरेख व दुरुस्ती विषयक कामे उद्यान विभागामार्फत करण्यात येतात. सदर उद्यानांमध्ये नागरिक /लहान मुले परदेशी नागरिक मोठ्या प्रमाणवर भेट देत असतात. (PMC Pune)

यंदा १६ ऑक्टोबर म्हणजे बुधवार रोजी “कोजागिरी पौर्णिमा” असून, पुणे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उद्यानांमध्ये भेट देत असतात. सबब, पुणे शहरातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे कि, सालाबादप्रमाणे “कोजागिरी पौर्णिमा” निमित्त पुणे महानगरपालिका हद्दीमधील उद्याने सकाळी ६.०० ते ११.०० व सायंकाळी ४.३० ते रात्री १२.०० वा. उघडी ठेवण्यात येणार आहेत. पुणे शहरातील नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन घोरपडे यांनी केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0