Transfer | PMC Pune | पुणे महापालिकेची नियतकालिक बदल्याबाबत कार्यवाही सविस्तर जाणून घ्या 

HomeBreaking Newsपुणे

Transfer | PMC Pune | पुणे महापालिकेची नियतकालिक बदल्याबाबत कार्यवाही सविस्तर जाणून घ्या 

Ganesh Kumar Mule Apr 18, 2023 2:35 PM

ChatBot | महापालिकेशी संबंधित माहिती सहजपणे नागरिकांना उपलब्ध करून देणेकरीता महापालिका ChatBot प्रणाली वापरणार 
PMC Officers Retirement | मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी, मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी महापालिका सेवेतून सेवानिवृत्त 
Pune Illegal Hoardings | जुना बाजार चौक आणि आर.टी.ओ. चौकात धोकादायक होर्डिंग! | बेकायदेशीर होर्डिंग आणि दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची अविनाश बागवे यांची मागणी! 

पुणे महापालिकेची नियतकालिक बदल्याबाबत कार्यवाही सविस्तर जाणून घ्या

पुणे | वर्षानुवर्षे एकाच खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने बदल्या केल्या आहेत. याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापना वरील ३१/०३/२०२३ अखेर एकाच खात्यात तीन वर्षे अगर त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या वर्ग २ व वर्ग ३ संवर्गातील प्रशासन अधिकारी, उपअधिक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता या पदावरील सेवकांची बदली महापालिकेच्या मंजूर धोरणानुसार खात्याच्या एकूण मंजूर पदांच्या २०% मर्यादेत करणेत आल्या असून, तसेच लेखनिक संवर्गातील उप अधिक्षक, वरिष्ठ लिपिक व अभियांत्रिकी संवर्गातील शाखा अभियंता या पदाच्या पदस्थापना करण्याची आली आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार  पुणे महानगरपालिकेकडील सर्व विभागातील शेड्युलमान्य पदांच्या वर्ग २ ते वर्ग ३ या संवर्गातील २० टक्के याप्रमाणे बदलीस पात्र असणा-या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – १०९, कनिष्ठ अभियंता (विद्युत) १७, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी ) – ६ असे एकुण १२२ आणि प्रशासकीय संवर्गातील वर्ग २ व वर्ग ३ या संवर्गातील प्रशासन अधिकारी ४, उपअधिक्षक ४३, वरिष्ठ लिपिक – ११२, लिपिक टंकलेखक – २७४ असे एकुण ४३३ अधिकारी/कर्मचारी यांची नियतकालिक बदली करण्यात आली.
तसेच शाखा अभियंता (स्थापत्य) – १८, उपअधिक्षक ५६, वरिष्ठ लिपिक – १३९ असे एकुण २१३ अभियांत्रिकी आणि प्रशासकीय संवर्गाकरिता पदस्थापना करण्यात आली.

अतिरिक्त महापालिका (जनरल) यांचे अध्यक्षतेखाली दि. १२/०४/२०२३ रोजी अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ट अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि १७/०४/२०२३ रोजी अभियांत्रिकी संवर्गातील शाखा अभियंता व प्रशासकीय सवंर्गातील उप अधिक्षक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक यांची बदली व पदस्थापना प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी संबंधित कर्मचा-यांना परिपत्रकाद्वारे आगाऊ सूचीत करणेत आले.

यासाठी बदलीपात्र कर्मचारी व रिक्त पदे यांची माहिती सर्वांना देणेत आली. त्यानुसार कर्मचारी यांनी सूचविलेल्या खात्यानुसार संबंधितांनी यापूर्वी कामकाज न केलेले खाते उपलब्धतेनुसार त्यांना नेमून देणेत आले.

शिक्षण विभाग उपअधिक्षक बदली १, वरिष्ठ लिपिक बदली – २, वरिष्ठ लिपिक पदस्थापना – ६, लिपिक टंकलेखक बदली – ८ असे एकुण १७ अधिकारी/कर्मचारी यांची नियतकालिक बदली करण्यात आली.

अशा प्रकारे बदलीपात्र वर्ग २ व ३ कर्मचा-यांच्या नियतकालिक बदल्यांची कार्यवाही समुपदेशनाने पूर्ण करणेत आली. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.