Katraj-Kondhava flyover: कात्रज कोंढवा उड्डाणपूल डबल डेकर करू : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

HomeपुणेBreaking News

Katraj-Kondhava flyover: कात्रज कोंढवा उड्डाणपूल डबल डेकर करू : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Ganesh Kumar Mule Sep 24, 2021 8:27 AM

Pune Municipal Corporation | उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुणे महानगरपालिकेचा गौरव
India’s First Girls’ School Groundbreaking for National Monument!
Ravindra Binwade PMC | पुण्यात मुलींच्या जन्माच्या प्रमाणात होत असलेल्या घरसरणीबाबत अतिरिक्त आयुक्तांची असंवेदनशीलता! 

कात्रज-कोंढवा उड्डाणपूल डबल डेकर करू

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आश्वासन

पुणे: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात 221 किलोमीटर लांबीच्या 22 महामार्ग प्रकल्पांचा नारळ गडकरींच्या हस्ते आज शुक्रवारी (दि. 24) फोडला. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल 134 कोटीं रुपयांची रस्ते, पुलांची कामे करण्यात येणार आहेत. त्यात कात्रज कोंढवा सहा पदरी उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा देखील समावेश होता. या भूमिपूजनाच्या वेळी मंत्री नितीन गडकरी यांनी आश्वासन दिले कि, हा पूल आम्ही डबल डेकर कसा करता येईल याबाबत प्रयत्न करू. जेणेकरून बरीच समस्या सुटेल. शिवाय त्यांनी ग्वाही दिली की, अशा सर्व प्रकल्पासाठी भारत सरकार नेहमी सहकार्य करेल.

: सातारा रोड वर नवीन पुणे विकसित करा

मंत्री नितीन गडकरी आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता कात्रज येथे महामार्ग प्रकल्पांचा भुमिपूजन आणि लोकार्पण सोहळा झाला. या उड्डाणपुलामुळे खडकवासल्यापर्यंत जाणाऱ्या वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार असून गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम मार्गी लागणार आहे. यावेळी मंत्री गडकरी यांनी उड्डाणपुलाच्या कामाबाबत उक्त आश्वासन दिले. गडकरी पुढे म्हणाले, कात्रज कोंढवा रस्त्यावर खूप अपघात होत होते. मात्र आता नागरिकांची त्यातून सुटका होणार आहे. तो आम्ही डबल डेकर करण्यासठी देखील प्रयत्न करू. पुणे सातारा रस्ता देखील असाच अडचणींचा होता. मात्र त्याचं काम देखील डिसेंबर अखेर पूर्ण होईल. आम्ही तिथल्या अपघाताचा एका संस्थेकडून अभ्यास करून घेतोय. आगामी काळात नवीन पुणे या बाजूला वसवण्यात यावे. जे पुण्यासाठी फायद्याचे होईल. गडकरी पुढे म्हणाले, राज्यातील महत्वाच्या प्रकल्पबाबत आम्ही मुख्यमंत्रीसोबत बैठक घेऊन मार्ग काढू.

: पालखी मार्ग म्हणजे राज्याचे सांस्कृतिक वैभव होईल

मंत्री गडकरी यांनी पुढे सांगितले कि, पुण्यातून पुढे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मार्गाचे काम जोरात सुरु होईल. कारण या मार्गासंबंधित भूसंपादन करण्याचे काम सुरु आहे. काही ठिकाणी टेंडर प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. जवळपास 12 हजार कोटींचे हा प्रकल्प आहे. हा पूर्ण झाल्यावर महाराष्ट्राच्या संस्कृतीक वैभवात भरच पडणार आहे.

: भूसंपादन करा रिंग रोडला निधी देऊ

गडकरी म्हणाले पुण्यात मेट्रो, नदी असे प्रकल्प मार्गी लागत आहेत. पुणे हे वेगानं विकास पावणारे शहर आहे. त्यामुळे इथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणे खूप गरजेचे आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री याना सांगितले कि, आपण भूसंपादन करून द्या आम्ही रिंग रोडला निधी उपलब्ध करून देऊ. तसेच भारत सरकारच्या भारत माला या प्रकल्पात याला मंजूर करून घेऊ. शिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरोत्थान नावाने जे हेड ओपन केले होते, त्यात निधीची तरतूद करण्यात यावी.

: विकास करताना 5-10% लोकांची नाराजी ओढवून घ्यावी लागते – उपमुख्यमंत्री

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले कि, शहरात विकास करताना अडचणी येतात. शिवाय नवीन काम करताना 5-10% लोकांची नाराजी ओढवून घ्यावी लागते, तेव्हा 90-95% लोकांची कामे मार्गी लागतात. मात्र हे करताना लोकांचे समाधान करणे महत्वाचे असते. पवार पुढे म्हणाले गडकरी साहेब आज आल्याने खूप प्रकल्प मार्गी लागले आहेत. गडकरी साहेब आपुलकीच्या नात्याने सर्व कामे करतात. गडकरी साहेब जसे सुचवतील तसे आम्ही राज्यात विकास करण्यात सहकार्य करू.

कात्रज कोंढवा भागातील गेल्या 30 वर्षाची समस्या सुटणार आहे. यासाठी मी 2015 पासून पाठपुरावा करतो आहे. माझ्या विनंतीला मान देऊन गडकरी साहेबानी याला मान्यता दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. शिवाय पालकमंत्र्यांना विनंती करतो कि, याबाबत लोकांची जी दिशाभूल केली जातेय, ती थांबवली जावी.

          योगेश टिळेकर, माजी आमदार.