Kasba Constituency | कसब्यातील भुयारी मार्गांच्या ‘डीपीआर’ निर्मितीला हिरवा कंदील

Homeadministrative

Kasba Constituency | कसब्यातील भुयारी मार्गांच्या ‘डीपीआर’ निर्मितीला हिरवा कंदील

Ganesh Kumar Mule Mar 20, 2025 7:18 PM

Pune Airport New Terminal | पुणे विमानतळ टर्मिनल खुले होणार | काँग्रेसच्या लढ्याला यश
PMPML CMD | Mohan Joshi Congress | पीएमपीचे कारभारी वर्षात तीन वेळा बदलले | महायुती सरकारने केला कारभाराचा खेळखंडोबा | माजी आमदार मोहन जोशी
Pune Congress | Loksabha Election | … तरच पुण्यात काँग्रेसला नवसंजीवनी!

Kasba Constituency | कसब्यातील भुयारी मार्गांच्या ‘डीपीआर’ निर्मितीला हिरवा कंदील

| सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची प्रशासनास सूचना

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या दोन महत्त्वाकांक्षी भुयारी मार्गांच्या प्रकल्पांना गती मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत भुयारी मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्याची माहिती कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे. (MLA Hemant Rasane)

शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या कसबा मतदारसंघात प्रमुख बाजारपेठा तसेच धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तू असल्याने दररोज हजारो नागरिक या भागामध्ये येत असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र कायम पाहायला मिळते. या भुयारी मार्गांच्या माध्यमातून वाहतुकीला गती मिळाल्याने वेळ आणि इंधनाची बचत होईल.

याबद्दल आमदार हेमंत रासने म्हणाले, “दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्त्यांमुळे या भागात उड्डाणपुलाचा पर्याय शक्य नसल्याने आम्ही भुयारी मार्गांची संकल्पना पुढे आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून याबद्दलचे सविस्तर निवेदन देण्यात आले होते. आज झालेल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याची सूचना प्रशासनास केल्याने भुयारी मार्ग निर्मितीस गती मिळणार आहे”.

बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, सदाशिव साळुंखे, उपसचिव प्रज्ञा वाळके, बी एस तेलंग, अव्वर सचिव प्रभाकर लहाने, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, खासगी सचिव सुधाकर भोसले आदी उपस्थित होते.