B Voc in Journalism Course |पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात बी. व्होक पत्रकारिता पदवीचे प्रवेश सुरु  | बारावी नंतर पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्रात कौशल्यपूर्ण करिअरची संधी

Homeadministrative

B Voc in Journalism Course |पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात बी. व्होक पत्रकारिता पदवीचे प्रवेश सुरु | बारावी नंतर पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्रात कौशल्यपूर्ण करिअरची संधी

Ganesh Kumar Mule May 08, 2025 3:21 PM

Old Pension Scheme | जुनी पेन्शन योजना | 14 मार्च च्या संपाला महापालिका कामगार युनियनचा पाठिंबा | मनपा कर्मचारी संपात सहभागी नसतील 
Pune Water Cut | १० ते १३ जानेवारी या काळात या भागातील पाणीपुरवठा राहणार अंशतः बंद अथवा विस्कळीत 
Pension | PMC | शिक्षण विभागाकडील पगारपत्रक लेखनिकाची एक वेतनवाढ कायस्वरूपी रद्द! | पेन्शन प्रकरणे मार्गी न लावल्याने अतिरिक्त आयुक्तांची तीव्र नापसंती

Journalism Courses |पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात बी. व्होक पत्रकारिता पदवीचे प्रवेश सुरु

| बारावी नंतर पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्रात कौशल्यपूर्ण करिअरची संधी

 

Solapur University – (The Karbhari News Service) – बारावी नंतर विद्यार्थ्यांना पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्रात कौशल्यपूर्ण करिअर घडवण्यासठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात (Punyashloka Ahilyadevi Holkar University) बी. व्होक पत्रकारिता पदवी अभ्यासक्रम (B Voc in Journalism) सुरु करण्यात आला आहे. बारावीचा रिझल्ट लागताच बी. व्होक पत्रकारिता पदवीचे प्रवेश सुरु झाले आहेत. तरी जागा मर्यादीत असल्याने विद्यार्थ्यांनी तातडीने प्रवेश घ्यावेत. असे आवाहन सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे आणि जनसंज्ञापन विभागाचे प्र. विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले आहे. (Journalism Course in Solapur University)

पत्रकारितेच्या क्षेत्रात व्यावसायिक शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलातील मास कम्युनिकेशन विभागामार्फत ‘बी. व्हॉक. जनर्लिझम’ या पदवी अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता थेट प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. हा अभ्यासक्रम बारावी नंतर थेट प्रवेश योग्य आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठीही उपयुक्त आहे. या अभ्यासक्रमासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग, दीड कोटी रुपयांहून अधिक निधीतून साकारलेले अत्याधुनिक टीव्ही व रेडिओ स्टुडिओ, तसेच प्रात्यक्षिक शिक्षण व इंटरशिपवर विशेष भर देण्यात येतो. शॉर्टफिल्म, डॉक्युमेंटरी प्रॉडक्शन, नागरिक पत्रकारिता, माध्यम साक्षरता यासारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न विभागाकडून केला जात आहे. विद्यापीठाकडे स्वतःचे प्रायोगिक विद्यावार्ता हे वृत्तपत्र असून, स्वतंत्र संगणक लॅब आणि प्लेसमेंट सुविधा सुद्धा पुरवण्यात येतात. त्यामुळे हा अभ्यासक्रम केवळ सैद्धांतिक नव्हे, तर व्यावहारिक ज्ञानही पुरवणारा ठरत आहे.या अभ्यासक्रमाची आखणी व अंमलबजावणी कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्र. कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

बी. व्होक पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमामुळे आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी यशस्वी करिअर घडवले असून, टी.व्ही. चॅनल्स, वृत्तपत्र, आकाशवाणी, एफ.एम. रेडिओ, वेब मीडिया, रेडिओ जॉकी, जनसंपर्क अधिकारी, संवाददाता, उपसंपादक, निवेदक, रिपोर्टर अशा विविध माध्यम क्षेत्रांमध्ये विद्यार्थी कार्यरत आहेत. तरी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींनी या अभ्यासक्रमासाठी अवश्य प्रवेश घ्यावा आणि सामाजिक क्षेत्रातील उज्ज्वल करिअरसाठी आतापासूनच तयारी सुरू करावी. सर्जनशीलता, अभ्यासूपणा व सामाजिक भान असणार्‍या विद्यार्थिनींसाठी ही सुवर्णसंधी आहे. तरी या अभ्यासक्रम प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी 9260489383, 8329839451, 9881050599 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन डॉ. गौतम कांबळे आणि डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: