Job Fair | MLA Sunil Kamble | आमदार सुनील कांबळे यांच्याकडून 5 जूनला नोकरी महोत्सवाचे आयोजन
| 80 कंपन्यांनी नोंदवला सहभाग
Job Fair | MLA Sunil Kamble | महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागा अंतर्गत राज्यभर इयत्ता दहावी व इयत्ता बारावी (10th, 12th students) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी योग्य तो मार्ग निवडण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचं (Job Guidance) आयोजन केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे शहर आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघांमध्ये (Pune cantonment constituency) डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, नाना पेठ, पुणे येथे सोमवार ५ जून २०२३ रोजी मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेले आहे. त्याचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (deputy chief minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) यांनी दिली. (Job Fair | MLA Sunil Kamble)
आमदार कांबळे यांनी सांगितले कि, या शिबिराला जोडूनच पुणे शहर व परिसरातील बेरोजगार युवक व युवतींसाठी नोकरी महोत्सव आयोजित केलेला आहे. या नोकरी महोत्सवामध्ये जवळपास ८० कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणतः दहा हजार नोकऱ्यांची उपलब्धता त्यांच्याकडे आहे. या रोजगार मेळाव्यासोबत आम्ही विविध बँकांना सुद्धा आमंत्रित केलेले आहे. (employment)
बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना कर्ज उपलब्ध व्हावे व ते कर्ज कसे उपलब्ध होईल याची माहिती सदर बँका देणार आहेत. याशिवाय आम्ही विविध वर्गांसाठी राज्य शासनाने ज्या संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन केलेल्या आहेत उदाहरणार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), जिल्हा उद्योग केंद्र, वस्त्रोद्योग विभाग, कामगार विभाग यांच्यासाठी आम्ही स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामध्ये
लाभार्थ्यांसाठी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व मार्गदर्शन केले जाईल. असे आमदार कांबळे यांनी सांगितले. (Job Fair)
आमदार कांबळे यांनी पुढे सांगितले कि. त्याचप्रमाणे विविध वर्गातील नागरिकांसाठी शासनाने जी महामंडळे स्थापन केलेली आहे. त्यामध्ये अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ या महामंडळाच्या ज्या योजना आहेत. त्या योजना बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी कशा उपलब्ध करून दिल्या जातील. याचे मार्गदर्शनही या मेळाव्यामध्ये होणार आहे. या नोकरी महोत्सवाचे मेळाव्याचे उद्घाटन सोमवार दिनांक पाच जून २०२३ रोजी सकाळी अकरा वाजता देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्ते व चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री पुणे तसेच गिरिषजी महाजन, ग्रामविकास, वैदयकिय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
—
सर्व बेरोजगार युवक युवतींना तसेच इयत्ता दहावी व
इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आव्हान करतो की आपण या व्यवसाय मार्गदर्शनमेळाव्याचा व रोजगारीची संधी उपलब्ध करून घेण्याचा लाभ घ्यावा या मेळाव्यामध्ये जास्तीतजास्त तरुण-तरुणींना नोकऱ्या देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
– सुनील कांबळे, आमदार
—-
——
News Title | Job fair organized by MLA Sunil Kamble on 5th June| 80 companies registered participation