Jansanvad Yatra | Pune Congress | पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॅन्टोन्मेंटमध्ये जनसंवाद यात्रा

HomeBreaking Newsपुणे

Jansanvad Yatra | Pune Congress | पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॅन्टोन्मेंटमध्ये जनसंवाद यात्रा

Ganesh Kumar Mule Sep 09, 2023 2:20 PM

Maratha Samaj Andolan | Prithviraj Chavan | गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – पृथ्वीराज चव्हाण
Pimpari Chinhwad Congress | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चिंचवड विधासभेवर दावेदारी
Aba Bagul Pune Loksabha | आबा बागुल यांची नाराजी दूर होईल | बाळासाहेब थोरात

Jansanvad Yatra | Pune Congress | पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॅन्टोन्मेंटमध्ये जनसंवाद यात्रा

 

Jansanvad Yatra | Pune Congress | पुणे – भारताची लोकशाही आणि डॉ.आंबेडकर यांनी दिलेले संविधान धाब्यावर बसवून मोदी सरकारचा (Modi Government) मनमानी कारभार, सरकारी यंत्रणांमधील वाढता हस्तक्षेप, महागाई आणि बेरोजगारी या विरोधात काँग्रेस पक्षाची जनसंवाद यात्रा (Congress Jansanvad Yatra) पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात (Pune Cantonment Constituency)  माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सायंकाळी काढण्यात आली.

यात्रेला सर्व थरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात्रेचा प्रारंभ कॅम्प मधील इंदिरा गांधी चौकातून करण्यात आला. ही यात्रा बाटा चौक मार्गे सेंट्रल स्ट्रीट पोलीस चौकी, कोळसा गल्ली, भोपळे चौक, कुरेशी मस्जिद, गुडलक हॉटेल, वखार चौक, चुडामण तालीम, जुना मोटर स्टॅण्ड, भवानी माता मंदिर, बनकर तालीम, दादापीर दर्गा, छाया टॉकिज, ए.डी.कॅम्प चौक, राजेवाडी, कॉर्टर गेट, संत कबीर चौक, मनुषा मस्जिद, रास्ता पेठ पॉवर हाऊस चौक अशा मार्गाने काढण्यात येऊन यात्रेचा समारोप नरपतगीर चौक येथे करण्यात आला.

या जनसंवाद यात्रेत ज्येष्ठ नेते पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या समवेत कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रविंद्र धंगेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, अविनाश बागवे, लता राजगुरू, पूजा आनंद, शानी नौशाद, रफिक शेख, मंजूर शेख, करण मकवाणी, जया किराड, नुरूद्दीन सोमजी, संगीता पवार, प्रविण करपे, सुरेश कांबळे, विठ्ठल थोरात, अमीर शेख, सुजित यादव,असिफ शेख, विजय जाधव, चेतन अगरवाल, कान्होजी जेधे, सुरेखा खंडागळे, प्रशांत सुरसे, अरूण गायकवाड आदी पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात्रा मार्गावर जनतेने यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केले, स्वागत फलकही लावण्यात आले होते. छोटे व्यापारी, पथारीवाले, युवक, महिला यांनी यात्रेतील नेत्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला, गाऱ्हाणी मांडली आणि सर्व जाती-धर्मात प्रेम निर्माण व्हावे या काँग्रेसच्या उद्देशाचे स्वागत केले.

भारत जोडो यात्रेतून कॉंग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी सामान्य जनतेशी संवाद साधला. त्यांच्याच प्रेरणेतून जनसंवाद यात्रा काढण्यात येत आहे. लोकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही यात्रा यशस्वी होत आहे, असे मनोगत मान्यवर वक्त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.