ऐकावे ते नवलच! : 115 कुटुंबांनी भीक मागणे सोडले
: पुणे महापालिकेचा अभिनव उपक्रम
भिक्षेकरी राबवत आहेत स्वछता अभियान
आयुष्य जगत असलेल्या लोकांशी रस्त्यातच संवाद साधुन, विश्वास निर्माण करून त्यांना छोटे व्यवसाय करण्यासाठी निधी अथवा वस्तु उपलब्ध करून देवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे असे या प्रकल्पाचे ढोवळ स्वरूप आहे. आजपावेतो ११५ कुटुंबांनी भीक मागणे सोडले असुन ते आता स्वतःच्या पायावर उभे आहेत. या दाम्पत्याने ५२ भिक्षेक-यांच्या मुलांच्या शिक्षणाची जवाबदारी घेतली आहे.
कोणतेही कौशल्य अंगी नसतांना भिक्षेक-यांच्या हाताला आता काय काम दयावे या विचारात असतांना आदरणीय संत गाडगेबाबांच्या विचारातून जन्माला आलेली हि भीक मागणाऱ्यांची खराटा पलटण! आठवड्यातून दर शुक्रवारी ही ४० लोकांची खराटा पलटण, आलटून-पालटून या संपूर्ण रस्त्याची स्वच्छता करीत आहे. दिनांक ७/०१/२०२२ रोजी खराटा पलटणचे ३५ भिक्षेकरी व कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयाचे सफाई कर्मचारी यांनी शनिवार पेठेतील ख्वाजा इसामुद्दीन (बडी दर्गा) दर्गाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून अंदाजे ५० कि. सुका कचरा गोळा केला.
याप्रसंगी अजित देशमुख, उपयुक्त, पुणे महानगरपालिका, डॉ. केतकी घाटगे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, डॉ अभिजित सोनावणे,संस्थापक सोहम ट्रस्ट, डॉ. मनीषा सोनावणे, अध्यक्षा सोहम ट्रस्ट, इमामुद्दीन इनामदार, प्रमुख आरोग्य निरीक्षक, मोहिते व बंडगर प्रमुख आरोग्य निरीक्षक, इतर आरोग्य निरीक्षक सफाई कर्मचारी व खराटा पलटणचे अंदाजे ३५ भिक्षेकरी स्वयंसेवी उपस्थित होते.
COMMENTS