Ganesh Bidkar vs Prashant jagtap : सरंजामदारी मानसिकता असलेल्या पक्षाला संविधान दिनाचे काही देणेघेणे नसणे हे स्वाभाविकच : सभागृह नेते गणेश बिडकर यांचा राष्ट्रवादीवर हमला 

HomeपुणेBreaking News

Ganesh Bidkar vs Prashant jagtap : सरंजामदारी मानसिकता असलेल्या पक्षाला संविधान दिनाचे काही देणेघेणे नसणे हे स्वाभाविकच : सभागृह नेते गणेश बिडकर यांचा राष्ट्रवादीवर हमला 

Ganesh Kumar Mule Nov 18, 2021 4:39 PM

PMC Employee : मनपा नगरसचिव कार्यालयातील सेवकांकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप
Pune : Vaccination : १५ ते १८ वयोगटाचा कोरोना लसीकरण प्रारंभ!
TP Scheme : PMC GB : टीपी स्किमचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध करण्यास मुख्य सभेची मान्यता 

सरंजामदारी मानसिकता असलेल्या पक्षाला संविधान दिनाचे काही देणेघेणे नसणे हे स्वाभाविकच

: सभागृह नेते गणेश बिडकर यांचा राष्ट्रवादीवर हमला

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर येत आहेत. यावरून राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपची आलोचना केली आहे. यावर सभागृह नेते गणेश बिडकर यांनी देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस वर हमला केला आहे. बिडकर म्हणाले कि, सरंजामदारी मानसिकता असलेल्या पक्षाला संविधान दिनाचे काही देणेघेणे नाही, हे देखील स्वाभाविकच आहे.

 

प्रशांत जगताप म्हणाले होते, भाजपचे  देशातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते व केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शहा हे २६ नोव्हेंबर रोजी पुण्यात येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते पुणे भाजपच्या वतीने विविध विकासकामांचा शुभारंभ आणि महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असल्याचे समजते. खरे तर ही गलितगात्र झालेल्या भाजपची केविलवाणी धडपड आहे.

यावर गणेश बिडकर यांनी प्रशांत जगताप यांनी उत्तर दिले आहे.

बिडकर म्हणाले, संविधान दिनाच्या दिवशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि रयतेचा राजा असलेल्या श्री. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे भूमीपूजन या कार्यक्रमासाठी अमित शहा पुण्यात येत आहेत. तो कार्यक्रम घेणे म्हणजे भाजपाच्या पायाखालची वाळू घसरणे आहे, असा विचार करणाऱ्या प्रशांत जगताप यांची आम्हाला कीव येते. सरंजामदारी मानसिकता असलेल्या पक्षाला संविधान दिनाचे काही देणेघेणे नाही, हे देखील स्वाभाविकच आहे. राष्ट्रवादीत राहून जगताप तुमची झेप फक्त सत्ता आणि निवडणूक यापुरतीच मर्यांदित झालेली आहे. पायाखालची वाळू कोणाची सरकते आहे, हे मार्च २०२२ मध्ये नक्कीच जगताप यांना समजेल.