Vadapav, Bhel : FDA : वडापाव, भेळ सारखे चमचमीत पदार्थ पेपर मधून देण्यास बंदी! 

HomeBreaking Newsमहाराष्ट्र

Vadapav, Bhel : FDA : वडापाव, भेळ सारखे चमचमीत पदार्थ पेपर मधून देण्यास बंदी! 

Ganesh Kumar Mule Dec 22, 2021 2:56 PM

PMC Encroachment Department | कारवाई करण्यासाठी आता पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे FDA ला साकडे!
FDA | Ganesh Mandal | गणेश मंडळाना प्रसादाबाबत नियमांचे पालन करण्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे निर्देश
Vadapav, Bhel : FDA : वडापाव, भेळ सारखे चमचमीत पदार्थ पेपर मधून देण्यास बंदी! 

वडापाव, भेळ सारखे चमचमीत पदार्थ पेपर मधून देण्यास बंदी!

मुंबई : वडापाव, भेळ, भजी यांसारखे चटपटीत पदार्थ पार्सल घेवून जाण्याचा आणि खाण्याचा नियम बदलणार आहे. (Vada Pav ) आतापर्यंत वर्तमानपत्रातून देण्यात येणारे हे पदार्थ येथून पुढे वर्तमानपत्रात पॅकिंग करून देता येणार नाहीयेत. याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाने आदेश काढले आहेत.

वर्तमानपत्र प्रिंट (News Paper) करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत केमिकल (Chemical In News paper Ink ) असल्याने गरम खाद्यपदार्थांच्या संपर्कात आल्यावर ते केमिकल विरघळते आणि ते आरोग्यास घातक (News Paper Ink Harmful for Health) असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्ही येत्या काळात पार्सल म्हणून वडापाव किंवा तत्सम पदार्थ घेणार असाल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वर्तमानपत्राच्या कागदामधील शाई पचनक्रियेत बिघाड करण्यास कारणीभूत ठरते, त्यामुळे या पुढे गरम खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून देणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

अनेक ठिकाणांवर किंवा गाड्यांवर पोहे, बटाटावडा,  यासारखे खाद्यपदार्थ सर्रासपणे छापील वर्तमानपत्रातून देण्यात येत होते. (Food Packing In News Paper) मात्र, आरोग्याच्या दृष्टीने हे घातक आहेत. टिश्यू पेपर किंवा किचन रोल्सच्या तुलनेत वर्तमानपत्र स्वस्त असल्याने हा पर्याय वापरला जातो. मात्र असे करणे आरोग्यासाठी घातक आहे. अन्नपदार्थाचे पॅकिंग त्वरित बंद करण्याचे आदेश छोटे, मोठे हॉटेल्स, बेकरी व्यावसायिक, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, गरम पदार्थांची विक्री करणाऱ्या हातगाडी विक्रेत्यांना देण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0