ऋतुराज ने सावरले CSK ला
: 88 धावांची दमदार खेळी
: IPL ची धडाक्यात सुरुवात
दुबई : कोरोनाच्या कारणास्तव प्रलंबित असलेल्या IPL च्या सामन्यांना आज धडाक्यात सुरुवात झाली. मात्र CSK चा सुरुवातीचा खेळ फारसा चांगला झाला नाही. मात्र ऋतुराज ने मैदानावर IPL च्या ऋतू वर राज करत 88 धावांची दमदार खेळी केली. त्यामुळे चेन्नईचा डाव सावरला. चेन्नई ने मुंबई समोर 156 धावांचा डोंगर उभा केला.
: शेवटच्या 5 ओव्हर फारच मनोरंजक
रविवारी iPL सामन्याची सुरुवात झाली. सुरुवातीलाच पारंपरिक स्पर्धक ज्यांना मानले जाते अशा मुंबई आणि चेन्नई चा सामना खेळवला जातोय. जरी या सामन्यात मुंबई चे कर्णधार रोहित शर्मा खेळत नसले तरी मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी दमदार सुरुवात करत चेन्नईला ला अगदी नामोहरम करून टाकले. ट्रेंट बोल्ट ने आपल्या पहिल्या दोन ओव्हर मध्ये महत्वाच्या दोन विकेट घेतल्या. मात्र त्यांनतर ही सुरेश रैना आणि चेन्नई चे कर्णधार महेंद्रसिंग धोनी फारसा चमत्कार दाखवू शकले नाहीत. हे काम केले ऋतुराज गायकवाड आणि त्याला साथ दिली रवींद्र जडेजा ने. शेवटच्या 5 ओव्हर मध्ये तर चेन्नईचा डाव पूर्णपणे सावरला. जडेजा माघारी गेल्यानंतर ब्रावो ने आघाडी घेत 3 षटकार मारत खेळ चांगलाच सावरला. शेवटी ब्रावो ला देखील पॅव्हेलियन ला परतावे लागले. तरीही ऋतुराज मात्र आपला जलवा दाखवतच होता. आपल्या 88 धावांवर नाबाद राहत ऋतुराज ने चेन्नई ला पूर्णपणे सावरले. मुंबईचा खेळ सुरु झाला तेंव्हा 20 धावांवर एक विकेट गेली होती.
COMMENTS