PMC Commissioner Bungalow | आयुक्त बंगल्यातील चोरीची पोलीस तक्रार देऊन चौकशी करा | मनसे सरचिटणीस किशोर शिंदे यांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी | चोरीबाबत सीआयडी चौकशी साठी आग्रह धरावा | विवेक वेलणकर
Kishor Shinde MNS – (The Karbhari News Service) – पुणे महानगर पालिकेच्या आयुक्त बंगल्यात झालेल्या चोरीची पोलीस तक्रार देऊन या प्रकरणाची चौकशी करून चोराला शासन करण्यात यावे. अशी मागणी मनसे सरचिटणीस किशोर शिंदे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. (Naval Kishor Ram IAS)

शिंदे यांनी आयुक्त यांना दिलेल्या निवेदना नुसार पुणे महानगर पालिकेच्या आयुक्त यांचे वास्तव्य असलेल्या बंगल्यातील अनेक वस्तु चोरीला गेल्याचे वर्तमान पत्रातील बातमीतून समजले. यामध्ये एअर कंडीशन, झुंबर, टी व्ही असे लाखो रुपये किंमतीचे साहित्य चोरीला जाते. यावर सामान्य पुणेकरांनी विस्वास कसा ठेवायचा? बंगल्यातून साहित्य गायब होते. या बंगल्याभोवती कडक सुरक्षा व्यवस्था असूनही चोरी होते. आता चोरी कोणी केली, हे पण सी सी टी व्ही कॅमेरे तपासले तर समजू शकते. पण कुंपणच शेत खाते का? किंवा यात चोरी कोणी केली याचा तपास करायचा नाही. कारण या विषयात पुणे महानगर पालिका प्रशासनाने पोलीस तक्रार देण्याची पण तत्परता दाखवली नाही. यात पूर्वीचे सेवा निवृत्त झालेले आयुक्त हे साहित्य आपलीच मालमत्ता समजून तर घेऊन गेले नाहीत ना? याचा पण शोध घेणे गरजेचे आहे. 20 लाख रुपये किमतीचे पुणेकरांच्या कररुपी पैशाची चोरी होऊनही प्रशासन गप्प का? या घटनेची पोलीस तक्रार पण नाही. या प्रकरणात कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न आयुक्त तर करीत नाही ना ? अशी शंका मनात येते कारण या पूर्वी पण महापौर बंगल्यात चोरी झाली होती त्याचा पण तपास झालेला नाही. त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे.
बंगल्यातील किमती वस्तूंच्या चोरीबाबत सी आय डी चौकशी साठी आग्रह धरावा | विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच
सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar Sajag Nagrik Manch) यांनी आयुक्त यांना मागणी केली आहे कि, आपल्या निवासस्थानी २० लाख रुपयांच्या किमती वस्तूंची चोरी होते ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. जर महापालिका आयुक्तांचा बंगला सुरक्षित नसेल तर सामान्य नागरीकांची सुरक्षा रामभरोसे राहणार हे दुर्दैवी चित्र निर्माण झाले आहे. आपण या संदर्भात मा. पोलिस आयुक्तांकडे तातडीने तक्रार दाखल करून या प्रकाराची सी आय डी चौकशी होण्यासाठी आग्रह धरावा कारण यामध्ये जसे बाहेरचे चोर असू शकतात तसे आतले दरोडेखोर ही सामील असू शकतात. यावर तातडीने कारवाई कराल अशी अपेक्षा आहे. असे वेलणकर म्हणाले.

COMMENTS