Funeral | अंत्यसंस्कार दरम्यान होतेय पैशासाठी अडवणूक! टेंडरचा उपयोगच काय ?

HomeBreaking Newsपुणे

Funeral | अंत्यसंस्कार दरम्यान होतेय पैशासाठी अडवणूक! टेंडरचा उपयोगच काय ?

Ganesh Kumar Mule Mar 23, 2023 1:03 PM

Salary System | महापालिका सेवकांच्या वेतन प्रणालीत होणार सुधारणा! | पे रोल, शिक्षण विभाग व सेवानिवृत्त सेवकांना एकत्रितपणे जोडणार
Deepali Dhumal | शहराच्या पश्चिम भागात नवीन हॉट मिक्स ( डांबर ) प्लांट सुरू करण्याची मागणी
PMC Pune Assistant Health Officer | राजेश दिघे यांना सहायक आरोग्य अधिकारी पदी  पदोन्नती

अंत्यसंस्कार दरम्यान होतेय पैशासाठी अडवणूक! टेंडरचा उपयोगच काय ?

| इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपकडून चौकशीची मागणी

पुणे : दहनभूमी तसेच दफनभूमी करीता एकाही संस्थेस अथवा व्यक्तीस दहनभूमी तथा दफनभूमी करीता निगराणी, देखरेख तसेच दहनाचा, दफन करण्याकरीता पैसे घेण्याबाबत कागदोपत्री अधिकार दिलेला नाही. तरीही यासंबंधी टेंडर काढले जात असेल तर तो निधी कुठे खर्च होतो, ते पालिकेने जाहीर करावे, अशी मागणी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम बागवान पत्रकाद्वारे केली आहे.

टेंडरची रक्कम नेमकी कशी खर्च होते, याबद्दल १५ क्षेत्रीय कार्यालयास माहिती नाही .इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप च्या दोन वर्षाच्या पाठपुराव्यामुळे हा मोठा भ्रष्टाचार उघड होत आहे. पुणे महानगरपालिका,महापालिकेचे परीमंडळ, क्षेत्रीय कार्यालय तसेच आरोग्य उप आयुक्त, आरोग्य आधिकारी, स्वतः आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे याबाबत माहिती उपलब्ध नाही, असे बागवान यांनी सांगितले.

टेंडरची रक्कम नेमकी कोठे खर्ची पडते. सुरक्षा कर्मचारी ठेकेदार पध्दतीने आहे तरी सफाई आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी करतात. तर ठेकेदारा कडील सुरक्षा रक्षक मनपाचा पगार ठेकेदाराकडून घेवून कमी पैशात दुसरा कर्मचारी नियुक्त करतो आहे.दहनभूमीत सरपण रचणारा तथा दफनभूमीत खड्डे खोदणारा याच्या नोंदी मनपा तथा क्षेत्रीय कार्यालये कडे उपलब्ध नाहीत. तोतया संस्था,अथवा तोतया व्यक्ती या ठिकाणी अनधिकृत बांधकामे, प्रार्थनास्थळे राजरोस पणे बांधून तेथे ट्रस्ट निर्माण करून विविध कारणाने नागरीकांकडून पैसे उकळतात. यास जबाबदार कोण प्रभागातील मान्यवर की महानगरपालिका ? की दोघांचे संगनमत ? या प्रश्नाची उत्तरे मनपा आयुक्त,अतिरिक्त आयुक्त, आरोग्य उप आयुक्त तथा संबधित सर्व अधिकारी यांच्याकडे नाहीत. मग येथील कारभार कशाच्या पाठबळाने चालू आहे असा प्रश्न असलम इसाक बागवान यांनी उपस्थित केला आहे.

मनपा जागेवर अतिक्रमण,जबरण ताबा,पैशाची वसूली तथा नागरीकांची दिशाभूल यावर पुणे महानगरपालिका गुन्हे दाखल करणार की राजकिय दबावाखाली फक्त सामान्य नागरिकांना वेठिस धरणार हा मोठा प्रश्न आहे.सध्या प्रशासकिय राजवट असूनही येथे मान्यवरांचीच चलती आहे या शिवाय पुण्यातील बहुतांश मालमत्ता राजकीय पुढार्याच्याच ताब्यात आसून करोडोंचा महसूल बुडवला जात आहे. यास जवाबदार कोण? असाही प्रश्न बागवान यांनी विचारला आहे.

या मालमत्ता तसेच दहन, दफनभूमी येथील तोतया संस्था तसेच व्यक्ती वर त्वरीत गुन्हा नोंद करून सामान्य जनतेस मिळणारे त्यांचे हक्क स्थानिक स्वराज्य संस्थेने त्वरीत बहाल करावेत, तसेच कोंढवा खुर्द येथील स न ४४.४५.४६ येथील मनपा ताब्यात असणारी रिकामी जागा त्वरीत दफनभूमी करीता उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी केली आहे.