International Grandparents Day | जागतिक दिनाच्या पूर्व संध्येला आजी आजोबांप्रती पुरस्कार रूपी कृतज्ञता

HomeBreaking Newsपुणे

International Grandparents Day | जागतिक दिनाच्या पूर्व संध्येला आजी आजोबांप्रती पुरस्कार रूपी कृतज्ञता

Ganesh Kumar Mule Sep 09, 2023 1:39 PM

City President | Pune Congress | कॉंग्रेसचा नवा शहर अध्यक्ष कोण?
Aba Bagul News | निलंबन केले असल्यास ते तातडीने मागे घ्यावे! |काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे आबा बागुल यांची मागणी
Akshay Tritiya | श्री.लक्ष्मीमाता मंदिरात तीन हजार हापूस आंब्यांची आकर्षक आरास | भक्तिमय वातावरणात दर्शनासाठी भाविकांची रीघ

International Grandparents Day | जागतिक दिनाच्या पूर्व संध्येला आजी आजोबांप्रती पुरस्कार रूपी कृतज्ञता

पुणे नवरात्रौ महोत्सव  राजीव गांधी ईलर्निंग स्कूलचा उपक्रम

आजीआजोबा नातवंड म्हणजे घरातील जुन्या नव्याचा संगम – डॉकुमार सप्तर्षी

 

International Grandparents Day | 

पुणे –  आजी आजोबांचा (Grandparents) त्यांच्या आय़ुष्यातील शेवटचा मित्र म्हणजे त्यांच नातवंडनातवंडच्या आयुष्यातील त्याचे पहिले मित्र म्हणजे आजी आजोबा असतात याचं कारण म्हणजे दोघांकडेही असलेला वेळलहान मुलांना भिती कशाची वाटत असेल तर ती अनोळखीपणाचीया अनोळखी गोष्टींची ओळख करून देणारे आजीआजोबा असतातजशा नद्या संगमाच्या ठिकाणी एकमेकांत मिसळतातत्यांचे पाणी ओळखू येत नाही तसेच आजी आजोबा नातवंड एकमेकांच्या सहवासात मिसळून जातातत्यामुळे आजी आजोबा नातवंड हा घरातील नव्या जुन्याचा संगम आहे. अशा शब्दात ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉकुमार सप्तर्षी यांनी भावना व्यक्त केल्या. (International Grandparents Day)

 

निमित्त होते ते जागतिक आजी आजोबा दिनाचे…… (International Grandparents Day) पुणे नवरात्रौ महोत्सव  राजीव गांधी  लर्निंग स्कूल यांनी जागतिक आजी आजोबा दिनाच्या पूर्व संध्येला डॉकुमार सप्तर्षी  उर्मिला सप्तर्षीज्येष्ठ गांधीवादी विचारवंत हरिभक्त परायण उल्हासदादा पवार  अनुराधाताई पवारडॉवीणा देव आणि कवयत्री डॉसंगीता बर्वे  राजीव बर्वे यांचा आदर्श आजी आजोबा पुरस्कार देऊन पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष  माजी उपमहापौर आबा बागूल यांनी सत्कार केलायावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे उपाध्यक्ष घनश्याम सावंतकोषाध्यक्ष  श्रीगणेश सहकारी बँकेचे अध्यक्ष नंकदुमार बानगुडेरमेश भंडारीनंदकुमार कोंढाळकरराजीव गांधी ईलर्निंग स्कूलचे प्राचार्य जांबुवंत मसलकर आणि पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सांस्कृतिक प्रमुख संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होतेसन्मान चिन्हंशालपुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आबा बागूल यांनी यामागची भूमिका स्पष्ट केलीते म्हणालेराजीव गांधी ईलर्निंग स्कूलचे सुमारे चारशे विद्यार्थी आयआयटीत शिकत किंवा शिकलेले आहेतआयएएस – आयपीएस होत आहेतदोन विद्यार्थी नासा संशोधन संस्थेत कार्यरत आहेतहे सर्व विद्यार्थी गरीब कुटुंबातील किंवा घरात कोणतिही शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातील आहेतया विद्यार्थ्यांकडे बघितल्यावर त्यांच्यावर चांगले संस्कार झाले तर ते चांगले नागरीक होऊ शकतात हा आत्मविश्वास मिळालात्यातून सध्या समाजातील एकंदर वातावरण बघून आम्ही दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हरवलेले संस्कार अशी मालिका गेल्या महिन्यापासून सुरू केली आहेयाचे पहिले पुष्प प्राजोशी यांनी गुंफलेहा दुसरा कार्यक्रम जागतिक आजी आजोबा दिनाच्या पूर्व संध्येला होत आहेआजी आजोबा ही घरातील संस्काराची केंद्र होतीआज संस्कार घरातच हरवले असल्याने मुलांवर बाहेरच संस्कार जास्त होऊन त्यातून नवे नवे प्रश्न तयार होत आहेतआजी आजोबा या कुटुंबातील दोन्ही संस्थांना योग्य सन्मान मिळणे किती आवश्यक आहे हे समजावण्यासाठी आदर्श आजी आजोबा पुरस्कार वितरण सोहळा आहेतसेच या दिवसाचे औचित्य साधून या महिन्यापासून दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आजी आजोबांनी आणि ते नसतील तर त्यांच्या पालकांनी शाळेत मुलांना सोडायला येणे बंधनकारक करत असल्याचे जाहीर केलेयावेळी त्यांनी पुण्यात नुकत्याच घडलेल्या घटनांचे दाखलेही दिले.

 

सत्काराला उत्तर देताना डॉसप्तर्षी पुढे म्हणालेनातवंडांच्यातील असुरक्षिततेची भावना आजी आजोबाच नष्ट करतातलहान मुलांना सतत अनेक प्रश्न पडत असतातत्याची उत्तरेही आजी आजोबांनी देणे आज आवश्यक झाले आहेतशी तयारी आजी आजोबांनीही केली पाहिजे हे मी माझ्या अनुभवावरून सांगतोजिथे अक्कल नसते तिथे नक्कल चालतेनातवंडांना वयोमानाने अक्कल नसल्याने ते आजी आजोबांचीच नक्कल करत असतातत्यामुळे आजी आजोबांनीही त्यांच्याशी वागताना जपून वागणे किंवा कृती केली पाहिजेआईवडीलही आपले मूल चांगले व्हावे यासाठी नवे नव शिकवत असतातत्याचवेळी आजी आजोबांनी त्याला विरोध करण्याऐवजी नातवंडाला चांगले बोलायलावागायला शिकवले पाहिजेकाय चांगले काय वाईट हे ओळखायला शिकवले पाहिजे.

 

डॉ. संगीता बर्वे यांनी त्यांच्या ‘झाड आजोबा ही त्यांची कविता म्हटली प्रक्षागृहातील सर्वांकडून म्हणून घेतलीत्या म्हणाल्याआजी आजोबांनी नातवंड शाळा कॉलेज मधून घरी आले की ते आज काय शिकले हे विचारले पाहिजे आणि आपणही ते शिकले पाहिजे.  यातूनच आपापसातील नातं घट्ट होत जातंनवे शिकण्यासाठी आज आजी आजोबांसाठीही एखादी शाळा असली पाहिजे असे त्यांनी नमूद केलेडॉवीणा देव म्हणाल्याआज तंत्रज्ञानाचे युग आहेनविन तंत्रज्ञान शिकवण्याठी आजी आजोबांनी आपल्या नातवंडाना गुरू केले पाहिजेसर्वात महत्वाचं म्हणजे आजी आजोबांनी तडजोड करायला शिकलं पाहिजे.

 

उल्हासदादा पवार म्हणालेया कार्यक्रमाला येऊन मला माझ्या आजी आजोबांची आठवण झालीआम्ही लहान असताना चिमणी पाखरं आणि बाळा जो जो रे हे चित्रपट संस्कारक्षम होते म्हणून घरातील सर्व मुलांना बघायला नेले होतेघरातील संस्कार आज कुठेतरी हरवल्यासारखे दिसतातते संस्कार आबा बागूल यांनी सांगितल्याप्रमाणे कुठे बाजारात विकत मिळत नाहीत त्यामुळे आणून देता येत नाहीतते घरातच होत असतातआजी आजोबाच नाहीतर आई वडीलभावंड सर्वांच्या वागण्याबोलण्यातून  कळत संस्कार लहान मुलांवर होत असतात.

 

कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून  स्वागत गीताने झालीत्यानंतर राजीव गांधी ईलर्निंग स्कूलमधील मुलांनी आजी आजोबांचे महत्व सांगणारे प्रहसन  कविता सादर केल्याकार्यक्रमाचे सूत्रसंचलन घनशाम सावंत यांनी केले तर आभार प्राचार्य जांबुवंत मसलकर यांनी मानलेकार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आजी आजोबा, मुलांसमवेत आलेले होते.