PMC Health Department | MNS Pune | महापालिका आरोग्य विभागाने काळजी घेतली नसल्याने साथीच्या आजारात वाढ   | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आरोप

HomeBreaking Newsपुणे

PMC Health Department | MNS Pune | महापालिका आरोग्य विभागाने काळजी घेतली नसल्याने साथीच्या आजारात वाढ | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आरोप

Ganesh Kumar Mule Aug 07, 2023 12:25 PM

MNS Pune | Pune Metro | पुणे मेट्रो स्थानकाची नावे छत्रपती शिवाजी महाराज  व महात्मा जोतिबा फुले मंडई स्थानक करा  | पुणे शहर मनसेची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी 
Sainath Babar : MNS : Pune : पुणे मनसेचे नवे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर! : वसंत मोरे यांना पदावरून हटवले  : मोरे यांनी बाबर यांचे केले अभिनंदन 
Raj Thackeray Pune Rally | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी  सभा

PMC Health Department | MNS Pune | महापालिका आरोग्य विभागाने काळजी घेतली नसल्याने साथीच्या आजारात वाढ

| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आरोप

 PMC Health Department | MNS Pune |  पुणे शहरात साथीच्या आजारांचा (Epidemics) वाढता प्रभाव झपाट्याने वाढत असल्याने पुणे शहरातील अनेक नागरिक आजारी असल्याची भयानक परिथिती निर्माण झाली आहे. पावसाळी आजाराचा (Monsoon Diseases) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगर पालिकेकडून (Pune Municipal Corporation) प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येतात.  परंतु यावर्षी पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून (PMC Health Department) कोणतीही काळजी घेतली नसल्याने साथीचे आजार वाढत आहेत.  प्रशासनाचे प्रयत्न तोकडे ठरत आहेत. असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS Pune) करण्यात आला आहे. तसेच आगामी काळात उपाययोजना नाही केल्या तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे कडून देण्यात आला आहे. (PMC Health Department | MNS Pune)
मनसेच्या निवेदनानुसार पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याबरोबरच त्यांना विशेष मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी, पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या काळात डासाची पैदास होऊ नये यासाठी योग्य काळजी घेतली नसल्याचे दिसून येत आहे. पालिकेचे अधिकारी उंटावरुन शेळ्या हाकत आहे. शहरात ठिकठिकाणी वाढलेले गवत दिसत आहे. गवतामुळे डासाची उत्पती वाढली आहे. वाढलेल्या डासांमुळे शहरात मलेरीया,डेंगू,चिकन गुणीया, थंडी, ताप आदि आजाराशी पुणे शहरवासीयांना  करावा लागत आहे. पुणे शहरातील रुग्णालयात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे. डेंग्यू , मलेरीया पाण्याद्वारे पसरणारे रोग तीव्र अतिसार व तत्सम आजार कॉलरा काविळ डोळ्यांचे आजार डोळे येणे, अनेक जंतूंचा प्रार्दूभाव होत असल्याने अनेकांना संसर्गजन्य आजाराची लागण होत आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये सध्या डोळे येण्याची साथ सुरु झाल्याचे आढळून येत आहे. पुणे शहरातील सर्व रुग्णालयात डोळे तपासणी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्यादेखील वाढली असून, डोळे येण्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. अनेक विद्यार्थी, पुणेकर नागरिक डोळे येण्याच्या आजाराने ग्रासले आहे. (Pune Municipal Corporation News)
पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी डॉक्टर आरोग्य सेवेतील कर्मचारी याची सर्वच स्थरावर उदासीनता दिसून येत आहे. प्रसूती  होणाऱ्या रुग्णालयात पुरेशे बेड उपलब्ध नाहीत याचा त्रास अनेक महिला व त्याच्या  कुटूंबियांना दररोज होत असल्याच्या अनेक तक्रारी महाराष्ट नवनिर्माण सेनेकडे आलेल्या आहेत. पुणे महानगर पालिकेच्या अनेक रुग्णालयामध्ये सेवाभावी संस्थांकडून डायलेसीस मशीन एक्सरे मशीन इतर आरोग्य तपासण्या करणासाठी लागणाऱ्या मशीन देण्यात आलेल्या होत्या. परंतु तपासण्या करणाऱ्या अनेक मशीन बंद असल्याने तपासण्या होत नसल्याने योग्य उपचार मिळत नाहीत.   त्यामुळे गोर गरीब जनतेचे दररोज हाल होत आहेत पुणे महानगर पालिकेकडून शहरी गरीब आरोग्य योजना राबवली जाते त्या योजनेचापण बोजवारा उडालेला आहे. उपचार घेणाऱ्या रुग्नाच्या नावे शहरी गरीब योजनेचे रुग्णालयास पत्र दिले तरी समंधीत रुग्णालये बिल भरण्याची मागणी करून नाहक रुग्नाना मानसीक त्रास देत आहेत. (MNS Agitation)
मनसे ने इशारा दिला आहे कि  पुणे शहरातील साथीचे आजारांचा प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे महानगर पालिकेने साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्यात याव्यात डेंग्‍यू, मलेरीया चिकन गुणीया, थंडी, ताप, डोळ्यांचे आजार, डोळे येणे   या साथीचा आजार वाढत आहे. असे असताना महापालिका प्रशासन सुस्‍त असून साथीच्‍या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्‍याही हालचाली केल्‍या जात नाही.  त्यासाठी पुणे शहरातील सर्व रुग्णालयातील रुग्नांची माहिती घेऊन सांख्यिकीय सूत्रांचा उपयोग करणे गरजेचे आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक रुग्णावर त्वरित उपचार करून साथीचे आजार आटोक्यात आणता येतील अन्यथा पुणेकरांच्या आरोग्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल. (PMC Pune News)
——
News Title |Increase in epidemics due to lack of care by the Municipal Health Department Allegation of Maharashtra Navnirman Sena