सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत महिला पत्रकारांसाठी दोन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन
पुणे : श्रीमती सोनिया गांधी (Soniya Gandhi Birthday) यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अठराव्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहात महिला पत्रकारांसाठी (Women Journalists) आयोजिलेल्या दोन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे (health check-up cam) उद्घाटन बुधवारी झाले. पुणे श्रमिक पत्रकार संघ, (PUWJ) पूना हॉस्पिटल (Poona Hospital) यांच्या सहकार्याने हे शिबीर होत आहे.
सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे मुख्य संयोजक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi), प्रसिद्ध उद्योगपती राजकुमार चोरडिया, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, पूना हॉस्पिटलचे डॉ. विनोद शहा, डॉ. गिरीश देशमुख, डॉ. इना गांगुली, वरिष्ठ पत्रकार चैत्राली चांदोरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले.
प्रसंगी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रशांत सुरसे, रमेश अय्यर, गौरव बोऱ्हाडे, चेतन अग्रवाल, सुरेश कांबळे, आयुब पठाण, धनजय भिलारे, किरण गायकवाड, राजेश सुतार, कान्होजी जेधे, आयुब पठाण, स्वाती शिंदे, अंजली सोलापूरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मोहन जोशी म्हणाले, “राजकीय कार्यक्रम घेण्यापेक्षा समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. धकाधकीच्या जीवनात महिला पत्रकारांनी आरोग्याची काळजी घ्यायला हवी. त्यांच्यासाठी हे विशेष शिबीर असून, यामध्ये सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. यामध्ये पूना हॉस्पिटल सहकार्य करीत आहे.
स्वप्नील बापट म्हणाले, “एक हेतू, उद्देश घेऊन सलग अठरा वर्षापासून एखादा उपक्रम चालणे कौतुकास्पद आहे. सेवा कर्तव्य त्याग या तिन्ही गोष्टी पत्रकारांशी निगडित आहेत. कामाच्या ओघात आरोग्याकडे दुर्लक्ष होते त्याचे गंभीर परिणाम होतात, हे गेल्या दोन वर्षात अनेकदा दिसले. त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्यासाठी सातत्याने उपक्रम राबवत आहोत.”
राजकुमार चोरडिया म्हणाले, “संवेदनशील वृत्तीने मोहन जोशी समाजातील प्रत्येक घटकासाठी उपयुक्त असा उपक्रम राबवत असतात. गेल्या अठरा वर्षात या सप्ताहाने भरीव असे योगदान दिले आहे. सामाजिक उपक्रमांतून वाढदिवस साजरा करण्याची ही परंपरा आदर्शवत आहे.
प्रास्ताविक राजू नानेकर यांनी केले. प्रशांत सुरसे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश अय्यर यांनी आभार मानले.