कसबा पेठ मतदारसंघात आतापर्यंत २८ लाख रुपये भरारी पथकाकडून ताब्यात   | कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्तात वाढ

HomeपुणेBreaking News

कसबा पेठ मतदारसंघात आतापर्यंत २८ लाख रुपये भरारी पथकाकडून ताब्यात | कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्तात वाढ

Ganesh Kumar Mule Feb 24, 2023 3:45 PM

Kasba By election | मतदारांना मतदार यादीतील नाव तपासून घेण्याचे आवाहन
cVIGIL | निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या करा तक्रारी
PMC Election | मतदार यादीत आजच नाव नोंदवून घ्या | आज शेवटचा दिवस

कसबा पेठ मतदारसंघात आतापर्यंत २८ लाख रुपये भरारी पथकाकडून ताब्यात

| कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्तात वाढ

पुणे | कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रशासनाने १३ हजार ५४२ वाहनांची तपासणी केली असून नाके तपासणी व भरारी पथकांच्या तपासणीत एकूण पाच घटनांमध्ये २८ लाख १८ हजार ५०० इतकी रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. ही रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात आली आहे

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूकीच्या प्रचारास शुक्रवार सायंकाळी ६ वाजेपासून प्रतिबंध आहेत. पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली असून नाके तपासणी आणखी कडक करण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. प्रचार समाप्ती नंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत, असे कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी कळविले आहे.