अतिक्रमण कारवाईत कसूर केल्यास अधिकाऱ्यांवरच होणार कारवाई
: उपायुक्त माधव जगताप यांचे आदेश जारी
: असे आहेत आदेश
शहरामधील रस्ते पदपथावरील अनधिकृत अतिक्रमणे काढणे बाबतची कारवाई आयुक्तांच्या आदेशानुसार संपूर्ण शहरामध्ये सुरु आहे. सदर कारवाई केल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमणे झाल्याचे दिसून येते. सदर झालेल्या अतिक्रमानंबाबत नागरिकांच्या तक्रारीमध्ये सातत्याने वाढ
होत आहे. त्याचप्रमाणे महापालिका फक्त समाधानापुर्ती कारवाई करत असल्याचे नागरिकांचे आरोप आहे. यामुळे ज्या भागामध्ये कारवाई केली जाईल त्या भागामध्ये पुन्हा सातत्याने अतिक्रमणाची कारवाई करून पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. शहरामध्ये विविध ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड बॅनर उभे करण्यात आलेले असून
त्याबरोबरच इलेक्ट्रिक बॉक्स यावर देखील पत्रके चिटकविण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे फ्लेक्स उभे करण्यासाठी बांबूचे स्ट्रक्चर उभे केले जाते या सर्व गोष्टी काढून टाकून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही होणे आवश्यक आहे. ज्या रस्त्यावर अतिक्रमणाची कारवाई होईल त्या रस्त्यावरील या सर्व गोष्टीबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी याबाबतची दक्षता संबंधित आकाशचिन्ह परवाना निरीक्षक यांनी घ्यावी.
अतिक्रमण कारवाई सुरु करण्याची वेळ सकाळी १०.०० वाजता निश्चित करण्यात आलेली आहे. तथापि, कारवाई वेळेत सुरु होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. बऱ्याच वेळा बांधकाम. आकाशचिन्ह, अतिक्रमण नियंत्रण विभागाकडून संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने कारवाई
सुरु होणेस उशीर होतो. त्याचप्रमाणे आवश्यक असणारे यंत्रसामग्री देखील वेळेवर पोहचत नसल्याने कारवाईस उशीर होतो. संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाईच्या ठिकाणी कारवाईसाठी 15 मिनिटे आधी पोहचून वेळेवर कारवाई सुरु होईल याची दक्षता घ्यावी. महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी अहवालामध्ये कारवाई सुरु होणेस उशीर झाल्याचे कारणांमध्ये संबंधीत अधिकाऱ्याचे नाव नमूद केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
COMMENTS