वडगाव शेरीत पुराचे पाणी शिरल्यास थेट अधिकाऱ्यांवर कारवाई
: आमदार सुनिल टिंगरे यांचा इशारा
: पूरग्रस्त ठिकाणची केली पाहणी.
पुणे : वडगाव शेरीतील विविध भागात पावसाचे पाणी शिरू नये यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र तरीही यावर्षी पुन्हा नागरीकांच्या घरात पुराचे पाणी शिरण्याचे प्रकार घडल्यास संबधित महापालिका अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाईची मागणी विधी मंडळात केली जाईल असा इशारा आमदार सुनिल टिंगरे यांनी दिला आहे.
वडगाव शेरीतील विविध भागात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात सातत्याने पाणी घुसून नागरिकांचे नुकसान होत आहे. महापालिकेकडून तरीही ठोस उपाय योजना होत नाही. येत्या पावसाळ्यात पुन्हा पूर परिस्थितीमुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये यासाठी ज्या जागी पूराचे पाणी जमा होते अशा पूरग्रस्त ठिकाणे आणि नालेसफाईची कामे यांची पाहणि आमदार टिंगरे यांनी महापालिका अधिकारांसमवेत वडगाव शेरीतील विविध भागात प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली. त्यात प्रामुख्याने विमाननगर, शास्त्रीनगर, कल्याणीनगर, सोमनाथनगर, आदर्शनगर, हरीनगर, गार्डेनिया सोसायटी, करण घरोंदा, डाॅन बाॅस्को शाळा, पार्क आयलंड सोसायटी, कल्याणीनगर जाॅगर्सपार्क शेजारील नाळा, आनंदा हायईट्स, थिटेवस्ती, चंदननगर पोलिस स्टेशन, पिट्टी मैदान याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
यावेळी आमदार टिंगरे यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची कारणे काय आहेत, त्यावर तत्कालीन आणि दीर्घकालीन काय काय उपाययोजना करतील यातील माहिती अधिकार्यनाकडून घेतली. तसेच याबाबत अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी नारायण गलांडे, उषा कळमकर, नाना नलवडे, प्रमोद देवकर, माऊली कळमकर, आशिष माने, निता गलांडे, आनंद सरवदे, अभिजित रोकडे, प्रभा बागळकोटकर, बाबासाहेब गलांडे, मनोज पाचपुते, कुलदीप वर्मा, समीर शेख, मोरेश्वर चांधरे, पुणे महानगरपालिका मलःनिसरण विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र मुळे, उप अभियंता विनायक शिंदे, कनिष्ठ अभियंता सिध्दाराम पाटील, नगररोड क्षेत्रिय कार्यालयाचे पुणे मनपा सहायक आयुक्त सुहास जगताप, उप अभियंता व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
COMMENTS