How to quit Bad Habits? | आपली इच्छा असते वाईट सवयी (Bad Habit) सोडण्याची. प्रयत्न करूनही ती इच्छा फलद्रुप होत नाही. असं का होत असावं. वाईट सवयी का सुटत नसतील? वाईट सवयी कशा सोडाव्यात? (How to quit Bad Habits?)
पहिली गोष्ट म्हणजे आपण वाईट सवय सोडण्यासाठी मनापासून धडपड करत नाही. आपण नुसते वरवरचे प्रयत्न करत राहतो. थोडे प्रयत्न करतो देखील. मात्र त्यात अपयश आले कि आपण लगेच विफल होऊन जातो आणि प्रयत्न सोडून देतो. इथेच गफलत होते. आपण अगदी मनापासून धडपड करायला हवीय. (Habits News)
मला ही सवय सोडायचीच आहे, असं मनाला वारंवार सांगत राहायला हवंय. त्यासाठी अंतर्मनाला देखील कामाला लावायला हवंय. दोन्ही मने जोडीने काम करू लागतील तर नक्कीच फायदा होईल. त्यासाठी positve affirmation ही पद्धत वापरायला हवीय.
अंतर्मनाला चांगल्या पद्धतीने कामाला लावण्यासाठी ‘The power of Subconscious Mind’ हे पुस्तक वाचा. Affirmation ने आपल्या मेंदूचं programing बदलेल. तसे करण्यात यशस्वी झालात कि तुमच्या मनात वाईट सवयी बाबतचे विचारच उत्पन्न होणार नाहीत.
मनात येणारे विचार लिहून काढणे (Journaling)
या पद्धतीचा चांगला उपयोग होऊ शकतो. आपल्याला ती सवय कशी लागली, आपण का बळी पडलो, आपण सवयीच्या कधी आहारी जातो, ती सोडण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो, सवय सोडण्याच्या कुठली पद्धत आपल्यासाठी योग्य आहे, हे सगळं लिहून काढायला हवंय. मनापासून लिहा.
लिहिण्याने तुमच्या विचाराच्या कक्षा रुंदावतील. मग हळूहळू तुम्ही विवेकवादी विचार करायला लागाल. तसे झाले कि वाईट सवयी बाबतचे विचार मागे पडू लागतील आणि तुम्ही आयुष्यात growth करण्याविषयी focus कराल.
हे जमलंच नाही तर लोकांना मदत मागा. Professional मदत मागा. पैसे गेले तरी हरकत नाही. सवय सोडण्यासाठी कुठले प्रयत्न राहू देऊ नका. हे सगळं मनापासून करत राहा. कारण universe तुमची परीक्षा पाहत असते. त्यामुळे तुम्ही किती मनापासून प्रयत्न करता हे महत्वाचं असतं.
तुम्ही प्रयत्न करत असताना वारंवार अपयश येत राहील, तरीही never give up. सोडून देऊ नका. प्रयत्न करा.
हे करताना outcome वर लक्ष देऊ नका. Process वर लक्ष द्या. Process महत्वाची आहे. Process enjoy करा. Failure enjoy करा. म्हणजे मानसिक त्रास होणार नाही.
——
Article Title | How to quit Bad Habits? | Why won’t bad habits get rid of? How to break bad habits?