Home Loan for PMC Employees | पुणे मनपा अधिकारी व कर्मचारी पुणे जिल्ह्यात कुठेही घेऊ शकतील घर किंवा जागा | गृहकर्जाच्या अटीत सुधारणा

Homeadministrative

Home Loan for PMC Employees | पुणे मनपा अधिकारी व कर्मचारी पुणे जिल्ह्यात कुठेही घेऊ शकतील घर किंवा जागा | गृहकर्जाच्या अटीत सुधारणा

Ganesh Kumar Mule Dec 13, 2025 9:34 AM

Pune Rain | Tree Fall | शहरात परवाच्या पाऊसाने शंभरहून अधिक ठिकाणी झाडपडीच्या घटना
Pune Flyover | उड्डाणपूल खुले करा | भाजपच्या ‘इव्हेंट’ची वाट पाहू नका – माजी आमदार मोहन जोशी यांचे महापालिका आयुक्तांना पत्र
Valmik Karad | वाल्मिक कराड याला पुण्यात राहण्यास कोणी कोणी साथ दिली ह्याची चौकशी करा | पुणे पोलिसांना शिवसेनेचे निवेदन

Home Loan for PMC Employees | पुणे मनपा अधिकारी व कर्मचारी पुणे जिल्ह्यात कुठेही घेऊ शकतात घर किंवा जागा | गृहकर्जाच्या अटीत सुधारणा

 

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंजूर करावयाच्या घरबांधणी अग्रिम प्रकरणी अटी व शर्ती सुधारित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता कर्मचारी आणि अधिकारी पुणे जिह्यात कुठेही घर किंवा जागा घेऊ शकणार आहेत. पूर्वी ही अट पुणे मनपा हद्दीपासून फक्त ५ किमी अंतरापर्यंत होती. याबाबत कामगार कल्याण विभागाकडून प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला धोरणात्मक मान्यता देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महानगरपालिकेच्या अधिकारीआणि कर्मचाऱ्यांना  घरबांधणी/घर/जागा खरेदी/घरदुरुस्ती, अन्य वित्तीय संस्थेकडून घेतलेले घरबांधणी अग्रिम परत फेडीसाठी अग्रिम दिले जाते. बेसिक च्या १२५ पट किंवा १ कोटी पर्यत हे गृहकर्ज दिले जाते.  मात्र  पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) व पी.एम.सी. एम्प्लॉईज युनियन यांनी वेळोवेळी निवेदनाद्वारे व समक्ष भेटून विविध मागण्य मागण्या केलेल्या होत्या. त्यानुसार  सध्या घर/जागा यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याने सर्वच कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या नजीकच्या ठिकाणी जागा/घर घेणे शक्य होत नाही.  मनपा हद्दीपासून ५ कि.मी. पर्यंत घर/जागा खरेदी करण्याची अट रद्द करून त्याऐवजी जागा/घर खरेदी क्षेत्र संपूर्ण पुणे जिल्हा करण्यात यावी. तसेच पुणे महानगरपालिकेमध्ये घरबांधणी अग्रिम मंजूर प्रकरणामध्ये कर्मचाऱ्यांना मासिक हप्त्या व्यतिरिक्त रोख स्वरुपात रक्कम वर्षातून दोन वेळा चलनाद्वारे भरणेबाबत परवानगी देण्यात यावी. तसेच मुदतपूर्व कर्जफेडीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला मान्यता देण्यात आली आहे.

असे ठरवण्यात आले आहे धोरण

१. मनपा अधिकारी/कर्मचारी यांना घरबांधणी अग्रिम मंजुरीकामी हद्दीची सध्याची अट “मनपा हद्द व हद्दीपासून ५ कि.मी. पर्यंत ” याऐवजी “संपूर्ण पुणे जिल्हा हद्द” करण्यात आली.
२. घरबांधणी अग्रिम मिळणेकामी भरावयाचा अर्ज मोफत (विनाशुल्क) दिला जाणार.
३. अग्रिम धारकाला ज्या महिन्यामध्ये मुदतीपूर्व कर्ज फेड करावयाची आहे त्यांनी त्या महिन्याच्या अंतिम दिनांकापर्यंत मुद्दल + व्याजाची पूर्ण रक्कम भरावी.
४. एकरकमी कर्ज फेडावयाच्या दिनांकास असलेल्या उर्वरित शिल्लक मुद्दल रकमेच्या ०.५०% इतकी रक्कम Pre-Closure charges म्हणून भरणे बंधनकारक राहील.
५. पुणे मनपा हद्दी बाहेरील परंतु पुणे जिल्हा हद्दीतील क्षेत्रामध्ये घर/जमिन घ्यावयाची असल्यास शासनाने प्राधिकृत केलेल्या संबंधित शासकीय प्राधिकरणाची बांधकाम परवानगी / ले-आउट परवानगी सादर करण्याची अट घरबांधणी अग्रिम मंजुरीच्या अटी शर्तीमध्ये समविष्ट करण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: