विद्यार्थ्यांनो झोप उडविणारी स्वप्ने बाळगा | यशवंत शितोळे
“विद्यार्थ्यांनी झोप उडविणारी स्वप्ने बाळगायला हवी. आपल्या नजरेतील स्वप्ने हातातील मोबाईला दाखवा. जगात कोणतेही संकट सांगून येत नाही. बौद्धिक, शारीरिक, मानसिक क्षमता ओळखून स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागा. वयाच्या कोणत्या वर्षी अधिकारी किंवा यशस्वी उद्योजक व्हायचे हे आधीच ठरवून तयारीला लागले पाहिजे. दिवसातील 24 तासांचे योग्य नियोजन केल्यास सर्व काही शक्य आहे, जगातील कोणतीही गोष्ट कठोर परिश्रमाने आपण शक्य करू शकतो” असे आवाहन महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान आणि सहायता कक्षाचे अध्यक्ष श्री यशवंत शितोळे यांनी विद्यार्थ्यांना केले.
ओतूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात, एकदिवसीय स्पर्धा परीक्षा उद्बोधन कार्यशाळेत ते बोलत होते.
सदर कार्यशाळेत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान आणि सहायता कक्षाच्या मार्फत आयोजित “करिअर कट्टा” उपक्रमा अंतर्गत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
जीवनात वेळेला खूप महत्व आहे, विद्यार्थ्यांनी वेळेच्या सदुपयोग करून स्वतःसह आपल्या पालकांचे स्वप्न साकार करावे, वेळ पुन्हा पुन्हा येत नाही. करिअर कट्टा च्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना अत्यल्प दरात कोणत्याही परीक्षेची तयारी करण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची सोय केलेली आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे इत्यादी माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कार्यशाळेत अध्यक्षतेस्थानी उपप्रचार्य डॉ. एस. एफ. ढाकणे होते. व्यासपीठावर उपप्रचार्य डॉ. के. डी. सोनावणे, डॉ. व्ही. एम. शिंदे, समन्वयक डॉ. नंदकिशोर उगले, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संतोष वाळके, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सुनील लंगडे, मराठी विभाग प्रमुख डॉ. वसंतराव गावडे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. अमोल बिबे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विनायक कुंडलिक, डॉ. रमेश काशीदे, डॉ. निलेश काळे, डॉ. भूषन वायकर, शिक्षकेतर कर्मचारी श्री. सतीश दांगट, श्री. सुरेश थोरात इत्यादींनी परिश्रम घेतले.
कार्यशाळेच्या समारोपानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभिप्राय घेऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र दिले