पुण्यात उद्या हनुमान चालीसा लावणारच
: मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांचा इशारा
पुणे : मशिदींवरील भोंगे उतरवण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘३ मे’ चा अल्टिमेटम दिला होता. जर भोंगे उतरवले गेले नाही तर उद्या बुधवारी चार मे पासून मशिदींसमोर जोऱ्यात हनुमान चालीसा लावला जाईला, अशा इशारा राज यांना दिला होता. मनसेचे (MNS) पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी हनुमान चालीसा लावणारच असे ट्विट करुन सांगितले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, पुण्यात (Pune) उद्या हनुमान चालीसा लावणारच तयारीत रहा.
पुण्यात उद्या हनुमान चालीसा लावणारच
तयारीत रहा @mnsadhikrut @abpmajhatv @zee24taasnews @SakalMediaNews @lokmat @SarkarnamaNews @LoksattaLive— साईनाथ बाबर Sainath Babar (@Sainathbabar7) May 3, 2022
दुसरीकडे आज मंगळवारी (ता.तीन) मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आले आहेत. तसेच राज्यातील पक्षाचे पदाधिकाऱ्यांवर कारवाई सुरु करण्यास पोलिसांनी सुरु केले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलली जात आहेत. खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांच्यावर दाखल कलमांवरुन सरकारवर टीका केली.
COMMENTS