“भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या-प्री प्रायमरी शाळेत “गुरुपौर्णिमा” कार्यकम संपन्न!”
शालेय विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर गुरूंच्या महात्म्याची जाणीव व्हावी, शालेय जीवनात भक्ती, शक्ती, विनम्रता, सहनशीलता, प्रामाणिकपणा, आज्ञाधारक पणा, त्याग ,सेवा,हे गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजवावेत, आई वडील, शिक्षक, यांच्या विषयी कृतज्ञता विद्यार्थ्यां मध्ये निर्माण व्हावी.या उद्देशाने “गुरुपौर्णिमा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष: मा. श्री. ज्ञानेश्वरजी सावंत(व्यवस्थापक, ज्ञान प्रबोधनी, निगडी) कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ.रोहिदासजीआल्हाट(समाजसेवक, ज्येष्ठ विचारवंत) हे होते. कार्यक्रमाची सुरुवात गुरु प्रतिमा पूजन करून आणि “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु देवो महेश्वरा!”या प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेमध्ये कार्यरत शिक्षक (गुरु) म्हणून सेवेत असणाऱ्या गुरूंचे नारायण हट शिक्षण संस्थेच्या वतीने गुलाब पुष्प आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शिक्षकांनी गुरुपौर्णिमेनिमित्त छोट्या मुलांना गुरुचे महत्व विशद केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. रोहिदास आल्हाट यांनी मार्गदर्शन करताना”गुरु हा सर्वश्रेष्ठ असून प्रत्येक व्यक्ती गुरूंच्या मार्गदर्शनाखाली घडत असते. प्रत्येकाने गुरुस्थानी असणाऱ्या आपल्या माता-पित्यांना, शिक्षकांचा आदर केला पाहिजे. आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता नेहमी ठेवली पाहिजे”
कार्यक्रमाचे अध्यक्ष: मा. श्री. ज्ञानेश्वर सावंत यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले”गुरुपौर्णिमेसारख्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार होण्यास मदत होणार आहे. आज शिक्षणाला संस्काराची जोड मिळण्याची गरज असून ते काम ज्ञान प्रबोधनीच्या मार्गदर्शनाखाली नारायण हट शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी केले जाते. भविष्यात ही शाळा संपूर्ण भोसरी परिसरात आदर्श शाळा म्हणून लवकरच नावलौकिकास पात्र ठरेल! ज्ञान प्रबोधिनीच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य या शाळेत करण्यात येईल!”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुशराव गोरडे (संचालक, नारायण शिक्षण संस्था) यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. आभार: सौ. प्रतिभा तांबे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता” वंदे मातरम!” गीताने झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्राचार्य, विजया चौगुले, प्रतिभा तांबे, सायली संत, मीनल बागुल, भाग्यश्री नगरकर, सुरेखाताई मुके, प्रवीण भाकड यांनी अतिशय मेहनत घेतली.
कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक/ पालक नारायण हट शिक्षण संस्थेचे संचालक, गृह संस्थेचे सभासद, संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.