Guru Pournima | “भारतीय संस्कृतीत गुरूला सर्वश्रेष्ठ स्थान”: डॉ.वसंत गावडे
Annasaheb Waghire College – (The Karbhari News Service)– पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात मूल्यशिक्षण उपक्रमांतर्गत गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने महाविद्यालयात दि.१० ते १४जुलै २०२५ दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र अवघडे व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. राजेंद्र आंबवणे यांनी दिली. (Pune News)
या उपक्रमांतर्गत विशेष व्याख्यान, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा व प्रश्नमंजुषा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाची सुरुवात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विशेष व्याख्यानाने झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महर्षी व्यासांच्या व गुरुवर्य कै.बाबुरावजी घोलप साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र अंबावणे यांनी केले. त्यांनी सर्व उपक्रमाची रूपरेषा सांगितली.
” गुरुपौर्णिमा आणि महर्षी व्यास” या विषयावर प्रा.डॉ.वसंत गावडे यांनी आपल्या व्याख्यानातून गुरुचे महत्व विशद केले. ते म्हणाले,”भारतीय संस्कृतीत गुरूला सर्वश्रेष्ठ स्थान आहे. शैक्षणिक,सामाजिक, राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक,अध्यात्मिक इ.क्षेत्रात गुरूंचे स्थान नेहमीच आढळ राहिले आहे. पौराणिक काळापासून आजपर्यंत गुरु-शिष्यांची परंपरा अबाधित आहे. आपल्याला तोच वसा आणि वारसा पुढे घेऊन जायचे आहे.”
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.कल्याण सोनावणे होते. ते अध्यक्षीय मनोगतात म्हणाले,”आपण ज्यांच्याकडून जे जे चांगले शिकतो ते सर्वच लहान- थोर आपले गुरुच असतात. आई – वडील- शिक्षक मित्र, आपल्यावर संस्कार करणारे सर्वच वडीलधारे आपल्या गुरुस्थानी असतात.”
भूगोल विभाग प्रमुख डॉ. ए.टी.पाडवी, हिंदी विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र रसाळ, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.नंदकिशोर उगले,डॉ. रमेश काशिदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. श्रद्धा अहिनवे, तनुजा घोलप,अर्णव बेनके, कोमल नलावडे, शितल कुमकर, सुरज राजुरे, या विद्यार्थ्यांनी गुरूंविषयी आदरभाव व्यक्त करणारी भाषणे केली.
नुकत्याच आळंदी ते पंढरपूर एन, एस,एस,वारीतील दिंडीत सहभागी झालेल्या कोमल नलावडे व शितल कुमकर यांचा महाविद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. आभार डॉ. निलेश काळे यांनी मानले. सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा. सुवर्णा डुंबरे यांनी केले

COMMENTS