Guru Pournima 2025 | गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यानिकेतन शाळेतील 33 विद्यार्थ्यांचा सत्कार
Nitin Kenjale PMC – (The Kabhari News Service) – डॉ.वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन, शुक्रवार पेठ या शाळेतील ज्या विद्यार्थ्यांनी 10 वीच्या परीक्षेत 85% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत अशा 31 विद्यार्थ्यांचा व शिष्यवृत्ती मिळालेल्या 2 अशा एकूण 33 विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आला होता. (Pune PMC News)
कार्यक्रमास नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी, पुणे महानगरपालिका हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. दत्ता नाईक यांनी करताना शाळेचं निकाल हा 100% लागला असून ही परंपरा गेली 30 वर्षे चालू असल्याचे नमूद केले. तसेच दरवर्षी गुणवंत विध्यार्थी यांचा सन्मान करण्यात येतो असे नमूद केले. त्यानंतर शिक्षक व विध्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तद्नंतर श्री.केंजळे यांचे हस्ते गुणवंत विध्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
नंतर केंजळे यांनी सर्व विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व या स्तुत्य कार्यक्रमास बोलावल्या बद्दल समाधान व्यक्त केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी भविष्यात चांगला अभ्यास करून स्वतः चे व शाळेचे नावं मोठे करावे, व्यसनापासून दूर रहावे, आपल्या ध्येयाकडे लक्ष द्यावे, गुरुजनांचा आदर करावा, मोबाईलचा वापर हा फक्त शिक्षण घेण्यासाठी करावा असे नमूद करून त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तदनंतर अध्यक्षीय भाषणात श्रीमती आशा उबाळे, शिक्षणाधिकारी, यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या व गुरू शिष्य परंपरेविषयी माहिती दिली व गुणवंत विध्यार्थी यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी दामोधर उंडे, उपशिक्षणाधिकारी , विठ्ठल भरेकर, माजी उपशिक्षणाधिकारी, दत्तात्रय नाईक, शालाप्रमुख, लता टेकवडे, माजी शालाप्रमुख, श्रीमती पवार, मुख्यध्यापक, श्री.तांबोळी, अध्यक्ष शिक्षण व्यवस्थापन समिती इ.मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS