Grand Prithvi Medical Foundation | ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनची स्थापना हा ऐतिहासिक क्षण  | मिलिंद गायकवाड

HomeBreaking Newsपुणे

Grand Prithvi Medical Foundation | ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनची स्थापना हा ऐतिहासिक क्षण | मिलिंद गायकवाड

Ganesh Kumar Mule Sep 18, 2023 4:55 PM

PMC commissioner | Budget | समान पाणीपुरवठा आणि आवास योजना पूर्ण करण्याचे लक्ष्य | आयुक्तांनी बजेट मध्ये केली भरीव तरतूद
PMC Pune Property Tax 40% Discount PT 3 Application Form | PT 3 application for 40% discount available on PMC Pune website
Corona Report : Pune : आज पुण्यात नवे २०७५ रुग्ण आढळले

Grand Prithvi Medical Foundation | ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनची स्थापना हा ऐतिहासिक क्षण  | मिलिंद गायकवाड

Grand Prithvi Medical Foundation | पुणे – वैद्यकीय क्षेत्रात रोल मॉडेल ठरावे अशा पद्धतीचे औषध विक्री करणारे मेडिकल स्टोअर (Medical Store) , पॅथॉलॉजी लॅब (Pathology Lab), डायग्नोस्टिक सेंटर (Diagnostic Centre) आणि पुढील पाच वर्षांमध्ये स्वतःचे 200 बेडचे हॉस्पिटल निर्माण करण्याचे स्वप्न आणि ध्येय गाठण्यासाठी ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनची (Grand Prithvi Medical Foundation) स्थापना पुण्यात  करण्यात आली. यासंबंधीची घोषणा करतानाचा आजचा ऐतिहासिक क्षण असल्याचे ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा मा. सहा. पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड (Milind Gaikwad) म्हणाले.
        भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स मधील 2013 च्या कायद्यानुसार कलम 8 अन्वये ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनची आज अधिकृतरित्या स्थापना करण्यात आली. फाउंडेशनच्या या पहिल्या बैठकीमध्ये संस्थेचे प्रमुख सल्लागार मा. सहा. पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे (Bhanupratap Barge) यांच्या हस्ते ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी झालेल्या पहिल्या बैठकीमध्ये सर्वच संचालक उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष मिलिंद गायकवाड, प्रमुख सल्लागार भानुप्रताप बर्गे, मुख्य विश्वस्त- सचिव उमेश चव्हाण (Umesh Chavan), मा. सहा पोलीस आयुक्त संगीता पाटील, संपर्कप्रमुख रोहिदास किरवे, उपाध्यक्ष आशिष गांधी, उपाध्यक्ष अशोक माझिरे, सहसचिव भानुदास मानकर, खजिनदार अपर्णा मारणे साठ्ये, संचालक सुनील जगदाळे, संचालक सचिन निवंगुणे, संचालक गणेश चव्हाण, संचालक रवींद्र चव्हाण, संचालक राकेश धोत्रे (Rakesh Dhotre), संचालक दुर्गेश मुरकुटे पाटील, संचालक इकबाल शेख, संचालक राजाभाऊ कदम, संचालक अजित चंगेडिया, संचालक हर्षद लोढा, संचालक मुकुंद म्हसवडे आदींची यावेळी अभिनंदनपर शुभेच्छा पर भाषणे झाली. आजच्या बैठकीत एकूण 36 ठराव करण्यात आले.
        ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनचे ब्रँडेड तथा स्टॅंडर्ड मेडिसिनचे ‘मेडिकल स्टोअरचे काम आता पूर्णत्वास आले आहे. पुण्यातील नारायण पेठेतील  केसरी वाड्याजवळ हे मेडिकल स्टोअर  5 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार आहे. याबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला. या मेडिकल स्टोअर मध्ये कितीही महागडे किंवा दुर्मिळ औषध व इंजेक्शन 70 टक्के स्वस्त दरात रुग्ण व नागरिकांना मिळणार आहेत. कोणतेही औषध फक्त 30 टक्के दरातच या ठिकाणी गरजूंना देण्याचे संस्थेने ठरविले आहे.
      यावेळी भानुप्रताप बर्गे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. बैठकीचे अध्यक्षस्थान मिलिंद गायकवाड यांनी भूषविले. प्रास्ताविक उमेश चव्हाण यांनी केले तर आभार अशोक माझिरे यांनी मानले.