Grand Parents Day | नारायण हट इंग्लिश माध्यम स्कूल “ग्रँड पॅरेंट्स डे”-आजी आजोबा दिवस साजरा
Grand parents Day | शनिवार रोजी नारायण हट इंग्लिश माध्यम स्कूल, भोसरी येथे सायंकाळी ४ वाजता “आजी आजोबा दिवस” साजरा करण्यात आला.. अशी माहिती प्रा.डॉ. वसंत गावडे यांनी दिली.
हा कार्यक्रम आजी-आजोबा आणि त्यांच्या नातवंडांचा हृदयस्पर्शी मेळावा होता.शंभर पेक्षा अधिक आजी आजोबा सहभागींसह हा दिन साजरा केला. सनई , ढोल ताशांच्या गजरात आजी- आजोबांचे स्वागत करण्यात आले.. सेल्फी काढुन नंतर सर्वजण स्थानापन्न झाले.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व गुरुवंदना , गीतेचा १२ वा अध्यायाने झाली..
आजी-आजोबा आणि नातवंडांमधील प्रेमाचा रेशीम बंध दृढ करणाऱ्या. ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे – श्री. शंकर देवरे सर, ह. भ. प. बंडोपंत महाराज शेळके यांचा परिचय, स्वागत प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका राक्षे मॅडम यांनी केले त्यांनंतर चिन्मय मिशन आयोजित गीता पठण स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.
आजी-आजोबा दिवसांचे महत्त्व सांगणारी हृदय स्पर्शी कविता – प्रविण भाकड सरांनी सादर केली. शिवन्या संत व शरण्या यांनी आजी आजोबांसाठी एक डान्स सादर केला. आजी-आजोबाची प्रत्येक नातवंडांनी पुजा पाय धुऊन हळदी कुंकू लावून केली.नंतर आजी-आजोबांनी नातवंडांना आशीर्वाद दिला.. आजी आजोबां साठी मनोरंजन खेळ घेण्यात आले.
– संत आजी-आजोबा
मोहितेआजी-आजोबा
– रानडे आजी-आजोबा
– अनप आजी-आजोबा
यांना ज्ञानेश्वर माऊली चीं मुर्ती भेट म्हणून देण्यात आली..
आजी-आजोबांनी नृत्य आणि मधुर गाणी गाऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.
आजी-आजोबांची भाषणे आणि मनोगत व्यक्त केले.
शाळेत चूल करून अल्पोपाहार तयार करून देण्यात आला देवरे सरांच्या भजनाने व पसायदानने कार्यक्रमाची सांगता झाली.. कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्या व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले..