Gliding Center Pune | ग्लायडिंग सेंटर हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला मानवी साखळी करून विरोध

Homeadministrative

Gliding Center Pune | ग्लायडिंग सेंटर हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला मानवी साखळी करून विरोध

Ganesh Kumar Mule Jan 05, 2025 8:45 PM

Ganesh Immersion Procession | विसर्जन मिरवणुकीनंतर शहर स्वच्छ करण्यासाठी पुणे मनपा सज्ज
Akhil Bharatiya Sahitya Sammelan | अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ‘सरकार्यवाह’पदी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
Aadhaar Update | UIDAI अलर्ट | ही माहिती आधार कार्डमध्ये अपडेट न केल्यास सरकारी योजना उपलब्ध होणार नाहीत | ₹ 25 अद्यतन शुल्क आहे

Gliding Center Pune | ग्लायडिंग सेंटर हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला मानवी साखळी करून विरोध

 

Gliding Center Hadapsar – (The Karabhari News Service) – हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर (Gliding Center Hadapsar Pune) बाबत गेल्या दोन वर्षापासून 99 वर्षाच्या करारावर च्या विरोधामध्ये गेली 15 दिवस माजी नगरसेवक योगेश ससाणे (Ex Corporator Yogesh Sasane)  नागरिकांसह रस्त्यावर उतरलेले आहेत . एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (Airport Authority of India) ला 1 रुपये नाममात्र भाड्यावर 99 वर्षाच्या कराराने PPP मॉडेल वर सदरची जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. (Gliding Center Hadapsar News)

निर्णय हा मागल्या दाराने खाजगीकरणाच्या दिशेने जात आहे. 187 रुपये नाममात्र पैशामध्ये एकदा ग्लायडर विमाना मध्ये बसता येतं व ज्यांना वैमानिक व्हायचा आहे त्या प्रशिक्षणार्थी वैमानिकांना 40 ते 50 हजार रुपये मध्ये वैमानिक होता येते. परंतु PPPमॉडेल वरती हस्तांतरित झाल्यास सदरचा 187 रुपये दर बंद होऊन तो कितीही मोठ्या प्रमाणात होऊ शकतो , त्यामुळे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुला -मुलींना ग्लायडर वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतील , म्हणून या निर्णयाविरोधामध्ये जवळपास 6000 पेक्षा जास्त नागरिकांनी सह्या केल्या असून 25000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांना भावनिक पोस्टकार्ड पत्र तयार करून पाठवली आहेत.

याचाच एक भाग म्हणून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण या विषयांमध्ये विरोध करणारे माजी नगरसेवक योगेश ससाणे आणि सोपान घोगरे यांनी आज केले , सदरचे उपोषण हे उद्या ग्ग्लडीग सेंटर च्या मेन गेट पुणे सासवड रोड या ठिकाणी सकाळी 8 वाजता चालू केले होते. आज दिवसभरात हडपसर पंचक्रोशीतील सुमारे १००० पेक्षा जास्त नागरिकांनी या ठिकाणी येऊन उपोषणाच्या ठिकाणी येऊन सही करून सदर गोष्टीचा निषेध नोंदवला आहे . तसेच मानवी साखळी करून या निर्णयाविरोधात असलेला विरोध दर्शविला.

ग्लायडीग सेंटर चे कॅप्टन  शैलेश चारभे याना आज सायंकाळी 6 वाजता मागणीचे निवेदन दिले या वेळी सोबत सोपान घोगरे , गणेश बोराटे , संजय आमंदे , सुरेश हिंगणे , अजित ससाणे , अभिजित घाडगे , बाबा भाडळे , विकास चोरघे , शरद तरडे , मोहन बलाई , संदीप कुंजीर , इत्यादी नागरीक उपस्थित होते