TDR: 6 मीटर रस्त्यांवर TDR वापरास परवानगी द्या : भाजप आमदाराचा प्रस्ताव

HomeपुणेPMC

TDR: 6 मीटर रस्त्यांवर TDR वापरास परवानगी द्या : भाजप आमदाराचा प्रस्ताव

Ganesh Kumar Mule Oct 05, 2021 6:24 AM

Pimpari-chinchwad Mayor : Mai Dhore : PMC : पिंपरीच्या महापौरांचे पुणे महापालिकेला पत्र : मनपा कडून काम सुरु झाले नसल्याची तक्रार 
Maratha Reservation Survey in Pune City | Pune PMC News | पुण्यात पुणे महापालिकेकडून 6 लाख 40 हजार घरांचे सर्वेक्षण | 45% काम पूर्ण
Ganesh Utsav Meeting | PMC Pune | पुणे महापालिकेची गणेश मंडळासोबत 28 ऑगस्ट ला संयुक्त बैठक

6 मीटर रस्त्यांवर TDR वापरास परवानगी द्या

: भाजप आमदार मुक्ता टिळक यांचा प्रस्ताव

पुणे: पुणे शहरामध्ये 2015 पूर्वी 6 मीटर रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास परवानगी होती. मात्र आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहराचा विकास ठप्प झाला आहे. त्यामुळे पुन्हा 6 मीटर रस्त्यांवर टीडीआर वापरास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार मुक्ता टिळक यांनी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव शहर सुधारणा समिती समोर ठेवण्यात आला आहे.

: शहर सुधारणा समिती समोर प्रस्ताव

प्रस्तावानुसार पुणे शहरामध्ये 2015 पूर्वी सहा मीटरच्या रस्त्यावर टीडीआर वापरण्याची परवानगी होती महाराष्ट्र शासनाने एमआरअॅडटीपी अॅक्ट कलम 154 अन्वये निर्देश देऊन सहा मीटर रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास बंदी घातली.
त्यामुळे पुणे शहरातील गावठाण परिसर पेठा परिसर आणि उपनगर यामध्ये पुनर्विकास जवळजवळ थांबला.  नवीन आलेल्या यूडी सीपीआरमध्ये देखील सहा मीटर रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास परवानगी नाही. पुणे महानगरपालिका ही नियोजन प्राधिकरण म्हणून एम आर अँड टी पी कायद्याच्या 37 कलमाद्वारे पुन्हा सहा मीटर रस्त्यांवर टीडीआर वापरण्याची परवानगी देण्यासाठी शहर सुधारणा मार्फत  मुख्य सभेच्या मान्यतेने नागरिकांकडून हरकती सूचना मागविण्यास मान्यता देण्यात यावी. असे प्रस्तावात म्हटले आहे.