Ghanbhatta Varas Hakka Case | घाणभत्ता वारस हक्काची सुनावणी आता 12 जानेवारीला ला
| आज सुनावणी होऊ शकली नाही
Aurangabad High Court | घाणकाम भत्ता वारसा हक्क (Ghanbhatta Allowance) अबाधित राहिलाच पाहिजे” या मागणीकरता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद बेंचसमोर (Aurangabad High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. मागील सुनावणी वेळी पुढील सुनावणी आज होईल, असे उच्च न्यायालयाने सांगितले होते. मात्र ही सुनावणी आज सुनावणी होऊ शकली नाही. उच्च न्यायालयाने ही सुनावणी आता 12 जानेवारी 2024 रोजी होईल असे जाहीर केले आहे. (Aurangabad High Court)
घाणकाम भत्ता वारसा अधिकार कायम रहावा. या मागणीकरता महाराष्ट्र सरकारने ठाम व परीणामकारक भूमिका घ्यावी म्हणून याचिका दाखल करण्यात आली आहे. २४ फेब्रुवारी २०२३ रोजी शासनाने जाहीर केलेल्या निर्णयाची स्थगिती उठवावी व घाणीत काम करणाऱ्या कष्टकरी कामगारांची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक उन्नती अजूनही मोठ्या प्रमाणात झालेली नाही. याची दखल शासन दरबारी असलेल्या प्रतिनिधींनी घ्यावी व यावरची स्थगिती तात्काळ उठवावी. अशी मुख्य मागणी आहे. दरम्यान घाणभत्ता वारस केस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद बेंचसमोर प्रलंबित आहे. (Ghanbhatta Varas Hakk)
12 जानेवारी 2024 रोजी घाणभत्ता वारस हक्क संबंधित मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. अशी माहिती महापालिका कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आली.