Contract Employees | पुणे मनपातील कंत्राटी कामगारांचा मेळावा | 250 सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घेण्याच्या निर्णयाबद्दल प्रशासनाचे मानले आभार

HomeपुणेBreaking News

Contract Employees | पुणे मनपातील कंत्राटी कामगारांचा मेळावा | 250 सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घेण्याच्या निर्णयाबद्दल प्रशासनाचे मानले आभार

Ganesh Kumar Mule Apr 05, 2023 12:59 PM

Layoff of Contract employees | ४५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा पुणे महापालिकेवर मोर्चा
Bonus | contract workers | मनपा कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदान देण्यास प्रशासन सकारात्मक | कामगार नेते सुनील शिंदे यांची माहिती
Security guards | contract workers | मनपा सुरक्षा रक्षक, कंत्राटी कामगारांवरीलअन्याय सहन करणार नाही | कामगार नेते सुनील शिंदे

पुणे मनपातील कंत्राटी कामगारांचा मेळावा

| 250 सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घेण्याच्या निर्णयाबद्दल प्रशासनाचे मानले आभार

पुणे महानगरपालिकेतील (PMC pune) कंत्राटी कामगारांचा मेळावा (Contract employees Gathering) काँग्रेस भवन येथे पार पडला. या मेळाव्यामध्ये राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे (Sunil Shinde) यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले. या मेळाव्यामध्ये गेली सहा महिन्यापासून 45 वयाची अट या व इतर कारणांसाठी विनाकारण कामावरून काढून टाकण्यात आलेल्या सुमारे 250 सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय मनपा आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांनी घेतल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. (contract employees)


या मेळाव्यासाठी पाणीपुरवठा विभाग, सुरक्षारक्षक विभाग, उद्यान विभाग, स्मशानभूमी विभाग, झाडन काम, कचरा वाहतूक करणारे चालक अशा विविध खात्यातील कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये बोलताना कामगार नेते व राष्ट्रीय मजूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सर्व सुरक्षा रक्षकांनी संघटनेवर विश्वास ठेवला व संघटनेच्या पाठीशी उभे राहिले म्हणून त्यांच्यासाठी संघटनेने आंदोलन उभारले व त्या आंदोलनाला यश येऊन या सर्व सुरक्षारक्षकांना पुन्हा पूर्ववत कामावर घेण्यात आले असे सांगितले. त्याचप्रमाणे सुनील शिंदे यांनी पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांना कायम कामगारांना एवढाच बोनस व 19 हजार रुपये दिला पाहिजे ही मागणी ही प्रशासनाने मान्य केली असून लवकरच याबाबत ही ठोस निर्णय संघटना करून घेईल असे आश्वासन यावेळी दिले ते पुढे बोलताना म्हणाले कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहिले पाहिजे. किमान वेतन कायद्यातील फरकाशी रक्कम तात्काळ दिली गेली पाहिजे, अशा महत्त्वाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघ कटिबद्ध असल्याचे सांगितले. या मागण्यांबाबत आपण प्रशासनाबरोबर वारंवार चर्चा करत असून या बाबतीत पालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घेतला नाही तर यापुढे मोठे आंदोलन छेडण्याचा निर्णयही यावेळी जाहीर केला.
या वेळामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण, सरचिटणीस एस के पळसे यांनी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे परिमंडळ प्रमुख विजय पांडव यांनी सूत्र संचालन केले तसेच स्मशानभूमीचे प्रमुख बाबा कांबळे व्हेईकल डेपोचे संदीप पाटोळे संजीवन हॉस्पिटलच्या मेघमाला काकडे इत्यादी कामगार नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. (pune municipal corporation)