Ganesh Immersion Procession | गणेश विसर्जन मिरवणुक | महापालिका प्रशासनाने जबाबदारी निभावली

HomeपुणेBreaking News

Ganesh Immersion Procession | गणेश विसर्जन मिरवणुक | महापालिका प्रशासनाने जबाबदारी निभावली

Ganesh Kumar Mule Sep 10, 2022 3:17 PM

Ganesh Visarjan Rath | PMC Pune | फिरत्या विसर्जन रथा बाबत पृथ्वीराज सुतार यांचा आक्षेप!
PMC Solid Waste Management Department | गणेश विसर्जन मिरवणुकी नंतर केलेल्या स्वच्छता अभियानात  ६७ टन कचरा व ३.५ टन चपला बूट केले गोळा! 
Sinhagad Road Traffic Diversion | सिंहगड रोड वाहतूक विभाग अंतर्गत वाहतूकीत बदल

गणेश विसर्जन मिरवणुक | महापालिका प्रशासनाने जबाबदारी निभावली

पुणे – गणेश विसर्जन मिरवणुकीत टिळक चौकात पुणे महापालिकेतर्फे मंडळाचे स्वागत केले जाते. महापालिकेत ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षाचे येथील मांडवात वर्चस्व दिसते. पण महापालिकेची मुदत संपल्याने टिळक चौकातील मांडवातून राजकीय प्रतिनिधी गायब झाले. या ठिकाणी प्रशासक होते. मात्र, मंडळांच्या स्वागतास आणि सत्कारास कोणतीही कसर सोडली नाही.

विसर्जन मिरवणुकीची सुरवात होताना महात्मा फुले मंडईत महापौरांच्या उपस्थित मिरवणुकीला सुरवात होते. मात्र, यंदा हा मान प्रशासक तथा आयुक्त विक्रम कुमार यांना मिळाला. त्यानंतर मानाच्या गणपतींची मिरवणूक टिळक चौकात आल्यानंतर तेथेही महापौरांच्या हस्ते मानाच्या गणपतीच्या अध्यक्षांना श्रीफळ देऊन स्वागत केले जाते. यावेळी महापालिकेचे सभागृहनेते, स्थायी समिती अध्यक्ष, विविध समित्यांचे अध्यक्ष व सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक उपस्थित असतात. त्यानिमित्ताने शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येतो.

यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत मात्र चित्र वेगळे होते. आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार हे टिळक चौकातील मांडवात आले नाहीत. पण अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, विलास कानडे यांनी मानाच्या गणपतीचे स्वागत केले. तसेच येथील खुर्चांवर महापालिकेच्या विभागांचे प्रमुख, अभियंते व इतर कर्मचारी मिरवणूक सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत उपस्थित होते.