Dams Water | चार धरणात जमा झाले मागील वर्षीपेक्षा अधिक  पाणी!

HomeपुणेBreaking News

Dams Water | चार धरणात जमा झाले मागील वर्षीपेक्षा अधिक  पाणी!

Ganesh Kumar Mule Jul 11, 2022 1:32 PM

Pune Rain | पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली | पाणीपुरवठा करणारी धरणे ९७% भरली 
Water cuts in Pune | येत्या गुरुवार पासून दर गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचे पाणी बंद राहणार | 20 ठिकाणी बसवले एअर वॉल 
Khadakwasla Canal Advisory Committee | पुणे महानगरपालिकेने गळती रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात | अजित पवार | 25 नोव्हेंबर पासून रब्बी आवर्तन

 चार धरणात जमा झाले मागील वर्षीपेक्षा अधिक  पाणी!

| धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडवासाला या चारही धरणाचा एकूण पाणीसाठा ९.४७  टीएमसी  झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी ८.६३ टीएमसी पाणी होते.  आता हे पाणी आगामी ७-८ महिने पुरेल इतके आहे. दरम्यान महापालिकेकडून हा पाणी साठा पाहता पाणी कपात देखील रद्द केली आहे.

खडकवासला धरण साखळीतील ४ धरणातील पाणी खूप कमी झाले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरात एक दिवसाआड पाणी सुरु केले होते. मात्र ईद आणि आषाढी एकादशी मुळे तात्पुरती त्याला स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता धरण क्षेत्रात वाढणारा पाण्याचा साठा पाहून पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. हा पुणेकरांसाठी दिलासाच आहे.

धरणातील पाणी साठा २ जुलै रोजी २.५१ टीएमसी पर्यंत खाली आला होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून या चारही धरणात पावसाला सुरुवात झाली होती.  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने आता७-८  महिन्यांचे पाणी वाढले आहे. सोमवारी सायंकाळी हा साठा ९.४७ टीएमसी इतका झाला आहे. या चारही धरणात अद्यापही पासून सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला २२ मिमी, पानशेत ८४ मिमी, वरसगाव ७५  मिमी तर टेमघर धरणात ६० मिमी पावसाची नोंद गेल्या २४ तासात झाली आहे.