Rekha Tingre | राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे भाजपात 

HomeपुणेBreaking News

Rekha Tingre | राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे भाजपात 

Ganesh Kumar Mule Aug 09, 2022 3:30 PM

Kasba By Election | कसबा पोटनिवडणूक | कॉंग्रेस, राष्ट्रवादीची आज बैठक तर शिंदे गट, भाजपची उद्या बैठक
Pune MP Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार | पुण्यावरही राहणार विशेष ‘फोकस’
Bilawal Bhutto Vs BJP | बिलावल भुट्टो यांच्या निषेधार्थ भाजपाचे राज्यात १२०० ठिकाणी आंदोलन

राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे भाजपात

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे (Rekha Tingre) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. दोन वेळा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नगरसेविका झालेल्या टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. रेखा टिंगरे यांना राष्ट्रवादीकडून स्थायी समिती सदस्य पदी देखील संधी देण्यात आली होती.

राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या भाजपाच्या माजी नगरसेवकांची आपल्याकडे मोठी यादी आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सुमारे दोन महिनयांपूर्वी जाहीर केले होते. सुमारे २५-३० माजी नगरसेवकांची ही यादी असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, राज्यात सत्तापालट झाल्याने आता भाजपाकडे येणाऱ्या माजी नगरसेवकांची संख्या वाढणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते त्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या सोयीची प्रभाग रचना करून घेतल्याचा आरोप करण्यात आला.त्यामुळे भाजपात असलेले अनेकजण राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. अनेकांनी तशी तयारी केली होती. मात्र, राज्यात पुन्हा सत्तापालट झाली. भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. त्यामुळे भाजपा सोडून राष्ट्रवादीत जाणाऱ्या अनेकांनी आपला पक्षांतराचा बेत रद्द केला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चंद्रकांत टिंगरे पुन्हा राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. याच काळात सत्तांतर झाले. शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. परिणामी टिंगरे यांच्या पत्नी माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनीच आज भाजपात प्रवेश केला.