सलग पाचव्या वर्षी अमोल बालवडकर यांनी दिवाळी केली गोड !
बालेवाडीमध्ये रावसाहेब दानवे,चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिवाळी सरंजाम वितरण
पुणे : पाच वर्ष अमोल बालवडकर यांनी नागरिकांची दिवाळी गोड करण्याचे काम केले आहे. त्यांनी नेहमीच अडी अडचणीत असणाऱ्या नागरिकांची सेवा केली आहे त्यांच्या समस्या सोडविल्या आहेत. असेच पुढील पाच वर्षात देखील नगरसेवक म्हणून अमोल बालवडकर यांना दिवाळी सरांजामाच्या महत्वाचा कार्यक्रम करण्याची संधी द्यावी. अशा शब्दात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे कौतुक केले.
: मराठवाड्यातील नागरिकांची काळजी अमोल बालवडकर नेहमीच घेत आले आहेत : बोर्डीकर
भाजपचे परभणी जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदिश मुळीक, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेवक किरण दगडे-पाटील, प्रकाशतात्या बालवडकर, स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर,ज्ञानेश्वर तापकीर,लहु बालवडकर, राहुल कोकाटे,सौ.उमाताई गाडगिळ,सौ.अस्मिता करंदिकर,प्रल्हाद सायकर, सुंदरशेठ बालवडकर,अनिलतात्या बालवडकर, हनुमंत बालवडकर, अनिल बाप्पु ससार, काळुराम गायकवाड, किरण तापकिर, सौ.राखी श्रीवास्तव, सौ.उज्वला साबळे, सौ.रिना सोमैया, सौ.स्मरणिका जुवेकर, अशोक बालवडकर, नामदेव गोलांडे, हनुमंत बालवडकर, अतुल आमले, अनंता चांदेरे, राजु पाडाळे पाटील, राजु पाषाणकर, रामदास विधाते, रामदास मुरकुटे, राजेश विधाते, भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व इतर मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले, “दिवाळी सरंजाम ही केवळ नागरिकांची दिवाळी चांगली जावी म्हणून एक भेट आहे. त्यामागे कोणतीही अपेक्षा नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये नागरिकांच्या समस्यांचे निराकरण जर मी केले असेल, त्यांची कामे केली असेल तर निश्चितच नागरिकांचे आशीर्वाद मला मिळतील. दिवाळी सरंजाम वितरण समारंभाला मी आपणास आमंत्रित केलं, आपण नेहमीप्रमाणे प्रेमाने सरंजाम स्वीकारण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात याबद्दल मी आपला सदैव ऋणी आहे.
कार्यक्रमाचे कौतुक करताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले “पाच वर्ष अमोल बालवडकर यांनी नागरिकांची दिवाळी गोड करण्याचे काम केले आहे. त्यांनी नेहमीच अडी अडचणीत असणाऱ्या नागरिकांची सेवा केली आहे त्यांच्या समस्या सोडविल्या आहेत. असेच पुढील पाच वर्षात देखील नगरसेवक म्हणून अमोल बालवडकर यांना दिवाळी सरांजामाच्या महत्वाचा कार्यक्रम करण्याची संधी द्यावी”
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, कोरोना काळामध्ये नागरिकांना आर्थिक दुरवस्था निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याचं काम अमोल बालवडकर करत आहेत .
परभणीच्या आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या “परभणी जिल्हा व मराठवाड्यातील नागरिकांची काळजी अमोल बालवडकर नेहमीच घेत आले आहेत व इथून पुढेही अशीच घेत राहतील याची खात्री आहे “. परभणीचे भाजपा जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनीदेखील बालवडकर यांच्या कामांचे कौतुक केले.
दरम्यान प्रल्हाद सायकर यांच्या संकल्पनेतून, स्वराज्य प्रतिष्ठान मार्फत बाणेर येथे उभारले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास रुपये २,५१,०००/- ची रोख देणगी अमोल बालवडकर फाऊंडेशन तर्फे दिली, प्रभागातील दिव्यांग गरजु व्यक्तीला तीन चाकी सायकल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते भेट दिली
COMMENTS