Grant of PMC Medical college : अखेर महापालिकेचे मेडिकल कॉलेज आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न! : विद्यापीठाने मेडिकल कॉलेजला दिली मंजुरी 

HomeपुणेBreaking News

Grant of PMC Medical college : अखेर महापालिकेचे मेडिकल कॉलेज आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न! : विद्यापीठाने मेडिकल कॉलेजला दिली मंजुरी 

Ganesh Kumar Mule Mar 24, 2022 2:00 PM

Health Schemes : PMC : आधुनिक उपचार हवाय तर मग खिशातले पैसे भरा; महापालिकेवर अवलंबून राहू नका 
Dr. Ashish Bharti | महापालिका आरोग्य अधिकारी डॉ आशिष भारती यांची अखेर बदली | राज्य सरकारकडून आदेश जारी
Prithviraj Sutar | क्ष-किरण तपासण्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्वरीत मोफत सुरू कराव्यात | अन्यथा आंदोलन करण्याचा पृथ्वीराज सुतार यांचा इशारा 

अखेर महापालिकेचे मेडिकल कॉलेज आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न!

: विद्यापीठाने मेडिकल कॉलेजला दिली मंजुरी

पुणे – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal corporation) भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला (Medical College) अखेर नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (MUHS) मान्यता दिली आहे. विद्यापीठाने महापालिकेला affiliation दिले आहे.  मेडिकल कॉलेज आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न झाले आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेज सुरु करण्याची सगळी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता आगामी काही दिवसातच विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरु होईल. अशी माहिती महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ आशिष भारती आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ अंजली साबणे यांनी दिली. दरम्यान पाहणी करायला आलेल्या कमिटीने कॉलेज मधील काही त्रुटी काढल्या आहेत. त्या पूर्ण करण्यास देखील सांगण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (नॅशनल मेडिकल कमिशन- एनएमसी) मान्यता दिल्यानंतर  राज्य शासनाने (State Government) देखील जीआर (GR) काढून २०२१-२२ म्हणजेच यंदापासूनच एमबीबीएसच्या (MBBS) प्रथम वर्षाचे प्रवेश प्रक्रिया (Admission Process) राबविण्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर  नाशिकच्या MUHS (Medical University Of Helath Science) ने कॉलेजच्या Head count ची तपासणी करत क्लास, प्रयोगशाळा, होस्टेल ची पाहणी केली होती.  त्यानंतर दोनच दिवसात आरोग्य विज्ञान विद्यापीठाने महापालिकेच्या मेडिकल कॉलेजला अंतिम मान्यता दिली आहे.

शहरात महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय असावे यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. एनएमसीच्या पथकाने पुण्यात येऊन महाविद्यालयातील वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, वसतीगृह यासह इतर सुविधांची पाहणी केली होती. त्यातील त्रूटी दूर केल्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या तयारी आढावा घेतला. त्यानंतर महाविद्यालय सुरू करण्यासाठी मौखिक मान्यता दिली होती. ७ मार्च रोजी लेटर आॅफ इनटेंट देऊन १०० जागांवर प्रवेश करण्यास केंद्र शासनाकडून मान्यता मिळाली. त्यानंतर दोन दिवसांनी लेटर आॅफ परमिशन ९ मार्च रोजी देण्यात आले आहे. हे दोन्ही पत्र महाविद्यालय सुरू करण्यासाठी महत्त्वाचे होते. त्याआधारे राज्य शासनाकडे महापालिकेने प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार  याबाबतचा आदेश काढून २०२१-२२ च्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे सीईटी सेलमार्फत एमबीबीएसच्या फेरीमध्ये या १०० जागा उपलब्ध होणार आहेत.
दरम्यान कॉलेज प्रवेशासाठीचा अंतिम टप्पा अजून बाकी होता. तो म्हणजे नाशिकच्या MUHS (Medical University Of Helath Science) ची कॉलेजला भेट. नाशिकच्या ३ लोकांची टीम पाहणी करण्यासाठी आली होती.  याबाबत डॉ आशिष भारती यांनी सांगितले कि, MUHS ने मान्यता दिल्यामुळे आता कॉलेज मध्ये प्रवेश प्रक्रियेच मार्ग मोकळा झाला आहे. आता विद्यार्थ्यांना हे कॉलेज लिस्ट वर दिसायला लागेल. त्यानुसार  लवकरच महापलिकेच्या मेडिकल कॉलेज मध्ये त्यांचा प्रवेश होईल. दरम्यान कमिटीने काढलेल्या त्रुटीबाबत डॉ भारती यांना विचारले असता, डॉ भारती म्हणाले, मी अजून कमिटीचा रिपोर्ट वाचलेला नाही.
तर महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ अंजली साबणे यांनी सांगितले कि, नाशिकच्या MUHS कडून महापालिकेला Affiliation प्राप्त झाले आहे.  म्हणजेच  महापालिकेचे मेडिकल कॉलेज विद्यापीठाशी जोडले गेले आहे.  आता कॉलेज सुरु करण्याची सगळी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच विद्यार्थ्याचे प्रवेश सुरु होतील.
विद्यापीठाने नियुक्त केलेल्या स्थानिक चौकशी समितीद्वारे खालील कमतरता आढळून आल्या आहेत
 A) प्राध्यापकांची कमतरता 10.5% आहे,
 B) ऑडिओमेट्री सुविधा उपलब्ध करून द्यावी.
 C) लायब्ररीत विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था वाढवावी.
 D) परीक्षेसाठी स्ट्राँग रूम आवश्यक आहे.
 e) छायाचित्र विभाग आणि कार्यशाळा स्थापन करावी.
 f) संस्थात्मक नैतिक समिती स्थापन करणे आवश्यक आहे.
 g) बॉम्बे ऍनाटॉमी ऍक्ट अंतर्गत परवानगी मिळणे बाकी आहे.
 h) संस्थात्मक संकेतस्थळ पूर्णपणे कार्यक्षम केले पाहिजे.
 i) औषध वितरण खिडक्या वाढवल्या पाहिजेत.
 j) वॉर्डातील क्लिनिक/डेमो रूम्स अपग्रेड करणे आवश्यक आहे.
 k) कॅन्टीन सुविधा सुधारित करावी.