Final Voter List | अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; जाणून घ्या मतदान केंद्रांची संख्या

Final voter list

Homeadministrative

Final Voter List | अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; जाणून घ्या मतदान केंद्रांची संख्या

Ganesh Kumar Mule Aug 30, 2024 6:34 PM

Pune Municipal Corporation Additional Commissioner | अतिरिक्त महापालिका आयुक्त पदाच्या शर्यतीत आता उरले दोनच अधिकारी! | दोघांनी घेतली माघार!
The State Government should not accept the PMC administration’s proposal regarding the change in promotion of the post of PMC Assistant Commissioner
Pune Water Issue | 7.25 TMC पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याची पालकमंत्री यांच्याकडे मागणी

Final Voter List | अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; जाणून घ्या मतदान केंद्रांची संख्या

| पुणे जिल्ह्यात ८६ लाख ४७ हजार १७२ मतदार

 

Final Voter List – (The Karbhari News Service) – भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार जिल्ह्याची अंतिम मतदार यादी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार जिल्ह्यात ४४ लाख ९१ हजार ६८ पुरुष, ४१ लाख ५५ हजार ३३० महिला आणि ७७४ तृतीयपंथीय असे एकूण ८६ लाख ४७ हजार १७२ मतदार आहेत, अशी माहिती श्रीमती कळसकर यांनी यावेळी दिली. (Pune News)

यावेळी तहसीलदार शीतल मुळे, राहूल सारंग तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यात एकूण ८ हजार ४१७ मतदान केंद्रे असून जुन्नर विधानसभा मतदासंघात ३५६ मतदान केंद्रे आणि १ लाख ६३ हजार २२४ पुरुष, महिला १ लाख ५७ हजार २४२ तसेच तृतीयपंथीय ४ असे एकूण ३ लाख २० हजार ४७० मतदार आहेत. आंबेगाव मतदार संघात ३४१ मतदान केंद्र असून पुरुष मतदार १ लाख ५७ हजार ४९४, महिला १ लाख ५१ हजार ७०३ आणि तृतीयपंथीय ९ असे एकूण ३ लाख ९ हजार २०६ मतदार आहेत.

खेड आळंदी मतदार संघात ३८९ मतदान केंद्र, पुरुष मतदार १ लाख ८९ हजार ४४४, महिला १ लाख ७७ हजार ४१७ आणि तृतीयपंथीय १२ असे एकूण ३ लाख ६६ हजार ८७३ मतदार आहेत. शिरूर मतदार संघात ४५७ मतदार केंद्र, पुरुष २ लाख ३७ हजार १९७, महिला २ लाख १८ हजार ३२० आणि तृतीयपंथीय २३ असे एकूण ४ लाख ५५ हजार ५४० मतदार आहेत.

दौंड मतदार संघात ३१० मतदान केंद्र, पुरुष संख्या १ लाख ६१ हजार २५१, महिला १ लाख ५१ हजार ८४७ आणि तृतीयपंथीय १२ असे एकूण ३ लाख १३ हजार ११० मतदार, इंदापूर मतदार संघात ३३७ मतदान केंद्र असून १ लाख ७१ हजार ४२१ पुरुष, १ लाख ६१ हजार ५९६ महिला आणि तृतीयपंथीय १३ असे ३ लाख ३३ हजार ३० मतदार आहेत.

बारामती मतदार संघात ३८६ मतदान केंद्रे, पुरुष मतदार १ लाख ९० हजार ८४१, महिला १ लाख ८४ हजार २९० आणि तृतीयपंथीय २१ असे ३ लाख ७५ हजार १५२ मतदार आहेत. पुरंदर मतदार संघात ४१३ मतदान केंद्रे, पुरुष मतदार २ लाख ३५ हजार २६१, महिला २ लाख १६ हजार ५०७ आणि तृतीयपंथीय ३२ असे ४ लाख ५१ हजार ८०० मतदार आहेत.

भोर मतदार संघात ५६४ मतदान केंद्र, पुरुष २ लाख २३ हजार ३५६, महिला १ लाख ९८ हजार १९१ आणि तृतीयपंथीय ६ असे ४ लाख २१ हजार ५५३ मतदार आहेत. मावळ मतदार संघात ४०२ मतदान केंद्र, पुरुष १ लाख ९४ हजार २१५, महिला १ लाख ८४ हजार ६१६ आणि तृतीयपंथीय १३ असे ३ लाख ७८ हजार ८४४ मतदार आहेत.

चिंचवड मतदार संघात ५६१ मतदान केंद्र, ३ लाख ३९ हजार ७२७ पुरुष, ३ लाख ३ हजार ९८९ महिला आणि तृतीयपंथीय ५३ असे ६ लाख ४३ हजार ७६९ मतदार आहेत. पिंपरी (अ.जा.) मतदार संघात ३९८ मतदान केंद्रे, पुरुष २ लाख ७९२, महिला १ लाख ८३ हजार १२ आणि तृतीयपंथीय ३० असे ३ लाख ८३ हजार ८३४ मतदार आहेत.

भोसरी मतदार संघात ४८३ मतदान केंद्रे, पुरुष मतदार ३ लाख १८ हजार ५७८, महिला २ लाख ६८ हजार २२० आणि तृतीयपंथीय ९७ असे ५ लाख ८६ हजार ८९५ मतदार आहेत. वडगांव शेरी मतदार संघात ४३७ मतदान केंद्रे, पुरुष २ लाख ५३ हजार ११६, महिला २ लाख ३६ हजार २७६ आणि तृतीयपंथीय १०२ असे एकूण ४ लाख ८९ हजार ४९४ मतदार आहेत.

शिवाजीनगर २८० मतदान केंद्रे, पुरुष १ लाख ४६ हजार १२९, महिला १ लाख ४३ हजार ५८७ आणि तृतीयपंथीय ४६ असे २ लाख ८९ हजार ७६२ मतदार, कोथरूड- ३८७ मतदान केंद्रे, पुरुष २ लाख २५ हजार ५०, महिला २ लाख ६ हजार ५७८ आणि तृतीयपंथीय २३ असे ४ लाख ३१ हजार ६५१ मतदार आहेत.

खडकवासला मतदार संघात ५०५ मतदान केंद्रे, पुरुष मतदार २ लाख ९७ हजार २०३, महिला २ लाख ६४ हजार ७१२ आणि तृतीयपंथीय ४० असे ५ लाख ६१ हजार ९५५ मतदार, पर्वती मतदार संघात ३४४ मतदान केंद्रे, पुरुष १ लाख ८० हजार २२, महिला १ लाख ७३ हजार ९४५ आणि तृतीयपंथीय ९५ असे एकूण ३ लाख ५४ हजार ६२ मतदार आहेत.

हडपसर मतदार संघात ५२५ मतदार केंद्रे, पुरुष मतदार ३ लाख २० हजार २६०, महिला २ लाख ८७ हजार ८४२ आणि तृतीयपंथीय ७२ असे ६ लाख ८ हजार १७४ मतदार आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट (अ.जा.) मतदार संघात २७४ मतदान केंद्रे असून यात १ लाख ४७ हजार ४९५ पुरुष, १ लाख ४३ हजार १६९ महिला आणि ३४ तृतीयपंथीय असे २ लाख ९० हजार ६९८ मतदार आहेत. कसबा पेठ मतदार संघात २६८ मतदान केंद्रे, पुरुष मतदार १ लाख ३८ हजार ९९२, महिला १ लाख ४२ हजार २७१ आणि तृतीयपंथीय ३७ असे २ लाख ८१ हजार ३०० मतदार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0