Felicitation: विद्यापीठ खुले केल्याबद्दल कुलगुरूंचा सत्कार

Homeपुणेमहाराष्ट्र

Felicitation: विद्यापीठ खुले केल्याबद्दल कुलगुरूंचा सत्कार

Ganesh Kumar Mule Sep 25, 2021 3:11 PM

School-college Reopen : पुण्यातील शाळा-महाविद्यालये 1 फेब्रुवारी पासून होणार सुरु  : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली नियमावली 
Shivneri Shree | महाराष्ट्र राज्यस्तरीय शिवनेरी श्री 2024 चा मानकरी ठरला मुंबईचा शशांक वाकडे
MNS Pune | Pune Metro | पुणे मेट्रो स्थानकाची नावे छत्रपती शिवाजी महाराज  व महात्मा जोतिबा फुले मंडई स्थानक करा  | पुणे शहर मनसेची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी 

विद्यापीठ खुले केल्याबद्दल कुलगुरूंचा सत्कार

: प्रकाश ढोरे व सुनील माने यांचा उपक्रम

पुणे: पुणे विद्यापीठ सर्वसामान्य जनतेसाठी व्यायाम आणि वाॅकसाठी खुले केल्याबद्दल पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. नितीन करमाळकर यांचे आभार मानत आज सत्कार केला. ज्येष्ठ विधीज्ञ आणि विद्यापीठांत अनेक वर्षे चालण्यासाठी येणारे ॲड. एस. के. जैन सर यांच्या हस्ते हा सत्कार केला. विद्यापीठ खुले करण्यासाठी मी केलेल्या प्रयत्नांचे ॲड. जैनसरांनी मन:पूर्वक कौतुक करीत शाबासकीची थाप दिली.
या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे रजिस्ट्रार डॅा. प्रफुल्ल पवार सर यांचेही आभार मानले. यावेळी उपकुलगुरू डॅा. उमराणी सर यावेळी उपस्थित होते.
कालपासून लोकांनी विद्यापीठाच्या आवारात फिरण्यास आणि व्यायामास येणे सुरू केले आहे. मी काही लोकांना भेटल्यानंतर त्यांना उत्साही, स्वच्छ आणि आनंदी वातावरणात व्यायाम व वॅाक करण्याची पुन्हा सुरूवात झाल्याचे मोठे समाधान दिसले.

या कामाचे समाधान मोठे आहे.

कोरोनाची तीव्रता कमी कमी झाली असल्याने शाळा, प्रार्थना स्थळे आणि सिनेमागृहेही सुरू होत असताना, लोकांचे आरोग्य सांभाळणारे व्यायाम व मैदाने खुली व्हावीत यासाठी मी व्यक्तिशः व्यायामप्रेमी म्हणून आणि भाजपाचा पदाधिकारी म्हणून आग्रही आहे. सर्वांना आरोग्यदायी आणि आनंदी जगण्यासाठी शुभेच्छा.

     प्रकाश ढोरे संचालक पीएमपीएमएल,  सुनील माने, पुणे शहर चिटणीस, भाजपा