FDA | PMC Water NOC | पुणे महापालिकेने FDA  ला विनंती केली पण FDA ने मात्र खुशाल हात वर केले | काय आहे प्रकरण?

HomeBreaking Newsपुणे

FDA | PMC Water NOC | पुणे महापालिकेने FDA ला विनंती केली पण FDA ने मात्र खुशाल हात वर केले | काय आहे प्रकरण?

Ganesh Kumar Mule Jun 16, 2023 4:54 AM

FDA | Ganesh Mandal | गणेश मंडळाना प्रसादाबाबत नियमांचे पालन करण्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे निर्देश
Vadapav, Bhel : FDA : वडापाव, भेळ सारखे चमचमीत पदार्थ पेपर मधून देण्यास बंदी! 
PMC Encroachment Department | कारवाई करण्यासाठी आता पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे FDA ला साकडे!

FDA | PMC Water NOC | पुणे महापालिकेने FDA  ला विनंती केली पण FDA ने मात्र खुशाल हात वर केले | काय आहे प्रकरण?

FDA | PMC Water NOC| FDA चे पुणे येथील कार्यालयामार्फत खादयपदार्थ बनविणे व विक्री करणारे व्यावसायिकांना परवाना देतेवेळी व परवान्याचे नुतनीकरण करतेवेळी पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे ना हरकत पत्र (PMC Water Supply Department NOC) घेणे बंधनकारक करावे, अशी विनंती पुणे महापालिकेच्या (PMC Pune) वतीने FDA ला करण्यात आली होती. FDA ने मात्र हा विषय आमच्या अखत्यारीत येत नाही म्हणून हात वर केले. यामुळे मात्र महापालिकेला आपल्या उत्पन्नात भर पडेल अशी जी आशा होती, त्यावर मात्र पाणी फेरले गेले आहे. (FDA | PMC Water NOC)

पुणे शहरामध्ये विविध खादयपदार्थ बनविणारे व विक्री करणारे व्यावसायिकांना ( अमृततुल्य, हॉटेल्स्, व इतर खादयपदार्थ बनविणारे इ) पुण्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे (FDA Pune l) कार्यालयामार्फत व्यवसाय करण्यासाठी परवाना मंजूरी / नुतनीकरण करण्यात येत असते. विभागाकडून परवाना मंजूरी / नुतनीकरण करताना पुणे मनपा, पाणीपुरवठा विभागाकडून पाणी बिलाची थकबाकी नसल्याबाबतचे ना हरकत पत्र घेतले जात नसल्याचे महापालिकेने FDA ला कळविले होते. त्यामुळे पुणे मनपाचे पाणी बिलाचे उत्पन्नावर परिणाम होत असल्याचे महापालिकेने नमूद केले होते. तसेच अन्न व औषध प्रशासनाकडुन व्यवसायिकांना परवाना देण्यापूर्वी व परवान्याचे नूतनीकरण करण्यापूर्वी पुणे महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे “ना हरकत पत्र घेण्यासंदर्भात संबंधितांना अन्न सुरक्षा आयुक्त यांचे स्तरावरून आदेश होणेबाबत आपण विनंती केली होती. (Food And Drugs Administration Pune)

यावर FDA प्रशासनाने आपला खुलासा सादर केला आहे. त्यानुसार  अन्न व औषध प्रशासन है अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ या केंद्रीय कायद्याची अमलबजावणी करते. या कायद्या अंतर्गत १२ लाखांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या अन्न व्यावसायिकांना नोंदणी व १२ लाखांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या अन्न व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक असून परवाना प्राप्त करण्याकरिता अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे FoSCoS या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज तसेच शुल्क भरण्यात येते. अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्ययसायिकांचे परवाना आणि नोंदणी) नियमन २०११ मधील प्रकरण २ मधील नियमन २.१ मधील तरतुदी नुसार व अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नयी दिल्ली यांनी ठरवून दिलेल्या धोरणानुसार परवाना/नोंदणीप्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन स्वीकारण्यात येतात. तसेच परवाना/ नोंदणीप्रमाणपत्र ऑनलाइन मंजूर करण्यात येतात. (Pune Municipal Corporation)
प्रशासनाने अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांना सर्व अन्न व्यवसायिकांना परवाना / नोंदणी मंजूर करताना संबंधित स्थानिक स्वराज संस्थेचा ना हरकत दाखला बंधनकारक करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ नियम व नियमने २०११ हा केंद्रीय कायदा असून सदर कायद्या मध्ये बदल / सुधारणा करण्याचे अधिकार केंद्र शासन व अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणास आहेत. तसेच  संकेतस्थळ / पोर्टल हे अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांचे नियंत्रणात असून त्यामध्ये बदल /सुधारणा करण्याचे अधिकार राज्य शासन तसेच या प्रशसनास नाहीत. तसेच अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांनी निश्चित केलेल्या कागदपत्रात कोणत्याही अन्न व्यवसायिकांना अन्न व्यावसाय करण्याकरिता पाण्याच्या थकबाकी बाबत संबंधित विभागाचे ना हरकत दाखल्याची तरतूद केलेली नाही. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाच्या पाण्याच्या थकबाकीबाबतचे ना हरकत दाखला बंधनकारक करण्याची बाब आमच्या प्रशासनाचे अधिकार कक्षेत येत नाही. असे आपल्या खुलाशात FDA ने म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेचा भ्रमनिरास झाला आहे. (PMC Water Supply Department)
—-
News Title | FDA |  PMC Water NOC |  Pune Municipal Corporation requested the FDA but the FDA raised its hand  What is the matter?