शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना १५ ऑक्टोबर पासून बेमुदत आंदोलन छेडणार
: अण्णा हजारे यांचे नेतृत्व
: विठ्ठल पवार राजे यांचे कलेक्टर पुणे यांना निवेदन
पुणे: पुणे जिल्ह्यातील पी एम आर डी ने टाकलेल्या आरक्षणा वर ऑब्जेक्शन घेत शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेला. यावेळी पीएमआरडीए चे अधिकारी पालक मंत्री व बाधीत शेतकरी यांची तत्काळ बैठक लावण्याची मागणी केली. सोबतच सन 21-22 गाळप हंगामासाठी ऊसाला पहिला विनाकपात हप्ता 2950 रुपये जाहीर करा, साखर कारखानदारावर संघटनेने केलेल्या तक्रारींच्या संदर्भात मध्ये तात्काळ बैठक लावा अन्यथा 15 ऑक्टोबर पासून आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. अशी माहिती विठ्ठल पवार राजे यांनी दिली.
: तात्काळ निर्णय करण्याची मागणी
या बाबत निवासी जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी व जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख साहेब यांना निवेदन दिले. दिलेल्या निवेदनावर तत्काळ निर्णय घ्या अन्यथा 15 ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, व पीएमआरडीए चे काम रोखू असा स्पष्ट इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार राजे, कार्यकारणी सदस्य नंदकिशोर लोखंडे पाटील, प्रवक्ते अशोक बालगुडे, दिपक फाळके, अर्जुन कोर्हाळे, डॉ राजू चौधरी, डॉ प्रकाश पाटील,गुलाबराव लोखंडे पाटील, अनिल भांडवलकर, प्रसाद अशोक घेनंद ,सागर लोखंडे ,किरण लोखंडे, किसन लोखंडे, दिलीप लोखंडे ,संजय तुपे, तुषार पाचपुते शंकर लोखंडे, सुनील गोडसे, गुलाब भोसले, चंद्रकांत घेनंद, युवती अध्यक्षा हर्षदा नंदकिशोर पाटील, महीला आघाडी सचिव मालती पाटील, महिला आघाडी अध्यक्षा स्वातीताई अजित कदम, डॉ रुपाली गजानन पाटील, कुमारी कोथेरे, दिपाली नंदकिशोर पाटील , युवक अध्यक्ष महेश गिरी आदी शेकडो शेतकरी या वेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी निवेदन स्वीकारले.
COMMENTS
शेतकऱ्यांविषयी अत्यंत सुरेख व चांगल्या बातम्या आपल्या वृत्त मीडियाच्या माध्यमातून येत आहेत सातत्याने शेतकऱ्यांच्या निगडित बातम्या व त्यांचे संबंधित व्यथा शासन प्रशासन दरबारी मांडल्या तर निश्चितपणे शेतकऱ्यांना न्याय मिळेल धन्यवाद
विठ्ठल पवार राजे प्रदेशाध्यक्ष
आम्ही कायम बळीराजा सोबत आहोत. आपले खूप धन्यवाद.