5 ते 10% सवलतीत मिळकतकर भरण्यासाठी 3 जून पर्यंत मुदतवाढ
: महापालिका प्रशासनाची माहिती
पुणे : महापालिका प्रशासनाकडून एप्रिल आणि मे महिन्यात मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना 5 ते10% सवलत दिली जाते. शेवटच्या दिवशी खूप कर भरला जातो. मात्र 31 मे लाच महापालिकेची ऑनलाईन यंत्रणा बंद होती. त्यामुळे इच्छा असताना देखील नागरिकांना भरणा करता आला नाही. यामुळे प्रशासनाला टीकेचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रशासनाने 3 जून पर्यंत सवलतीत कर भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. दरम्यान १ एप्रिल ते ३१ मे या दोन महिन्याच्या कालावधीत महापालिकेच्या तिजोरीत पुणेकरांनी तब्बल ९३९ रुपये कोटी रुपये केले आहेत. गेल्यावर्षी या दोन महिन्यात ७४६ कोटी रुपये जमा झाले होते. अशी माहिती उपायुक्त अजित देशमुख यांनी दिली.
पुणे महापालिकेतर्फे नागरिकांना मिळकत कर भरण्यासाठी प्रोत्साहन म्हणून १एप्रिल ते ३१ मे या कालावधीत २५ हजारापेक्षा जास्त मिळकत कर असल्यास पाच आणि २५ हजारापेक्षा कमी रक्कम असल्यास दहा टक्के सवलत दिली जाते. पुणे शहरात एकूण अकरा लाख जास्त मिळकतधारक आहेत. त्यापैकी पाच लाख ९३ हजार २७० नागरिकांनी यंदा दोन महिन्यात कर भरला आहे. ९३९ कोटी रुपये रक्कम जमा झाली असून म सवलतीसाठी १९.२१ कोटी रक्कम माफ केली आहे.
सवलतीत टॅक्स भरण्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात भरणा केला जातो. यंदा ३० आणि ३१ मे या दोन दिवसात तब्बल १३२.६७ कोटी रुपयांचा भरणा झालेला आहे. शेवटच्या दिवसात ऑनलाइन भरणे करताना महापालिकेच्या संकेतस्थळावर लोड येऊ शकतो. त्यामुळे यंत्रणा सतर्क असते मात्र, यावर्षी ही यंत्रणा शेवटच्या दिवशी कोलमडून पडली. ३१ मे रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने पैसे भरता येत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. नागरिकांची भावना लक्षात घेऊन अखेर महापालिका प्रशासनाने मिळकत कर भरण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. नागरिकांना एक जून ते तीन जून या कालावधीत पाच ते दहा टक्के सवलतीचा फायदा घेता येणार आहे.
“यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत १९३.८८ कोटी रुपये जास्त उत्पन्न या दोन महिन्यात मिळालेले आहे. गेल्यावर्षी ७४६ कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते तर यंदा ९३९ कोटी रुपये जमा झालेले आहेत. यंदा पाच लाख ९३ हजार २७० नागरिकांनी कर भरलेला आहे.
अजित देशमुख, उपायुक्त
COMMENTS